England Cricket Board blaming IPL  esakal
क्रीडा

अ‍ॅशेस हरली इंग्लंड शिक्षा मात्र राजस्थान रॉयल्सला?

अनिरुद्ध संकपाळ

लंडन : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या अ‍ॅशेस कसोटी (Ashes Series) मालिकेत इंग्लंडने अत्यंत खराब कामगिरी केली. इंग्लंडचा यंदाच्या अ‍ॅशेस मालिकेत ३ - ० अशा फरकाने दारुन पराभव झाला. अजून मालिकेतील पाचवी कसोटी शिल्लक आहे. मात्र इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) या पराभवाचे खापर आयपीएलवर फोडले आहे. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना आयपीएल (IPL) खेळण्यास बंदी घालू शकते. त्यामुळे राजस्थान रॉयल्सची गोची होण्याची शक्यता आहे. कारण राजस्थानने जोस बटलरला रिटेन केले आहे. याचबरोबर सर्वाधिक इंग्लिश खेळाडू हे राजस्थानकडून खेळतात.

माध्यमांमध्ये आलेल्या बातमीनुसार इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे कार्यकारी संचालक आणि माजी खेळाडू अ‍ॅश्ले जाईल्स (Ashley Giles) यांनी इंग्लंड संघासाठी पूर्ण रोडमॅप तयार केला आहे. यात इंग्लंडच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये सामिल होण्यापासून रोखण्याची चर्चा सुरु आहे. या वर्षी इंग्लंड मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध मालिका खेळणार आहे. अ‍ॅशेस मालिकेत खेळणाऱ्या इंग्लंड संघातील बेन स्टोक्स (Ben Stokes) , जोस बटलर (Jos Buttler) आणि जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) हे सातत्याने आयपीएल खेळतात. याचबरोबर मोईन अली देखील चेन्नईकडून खेळणार आहे.

या पूर्वीही इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आयपीएलमुळे खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होत असल्याची तक्रार केली होती. सध्या भारतात आयपीएलच्या मेगा लिलावाची (IPL Mega Auction) जय्यत तयारी सुरु आहे. जर इंग्लंडकडून काही अधिकृत घोषणा झाली तर फ्रेंचायजी इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये फारसा रस दाखवणार नाहीत. आपीएलचा मेगा लिलाव बंगळुरूमध्ये १२ आणि १३ फेब्रुवारीला होणार आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात १० संघ असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shanivarwada Controversy : शनिवारवाड्यासमोर तणाव वाढला! नमाज पठणाच्या 'त्या' व्हिडीओनंतर मेधा कुलकर्णींसह हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते आक्रमक

Metro 2B: मेट्रो-२ बीचा पहिला टप्पा कधी सुरू होणार? तारखेबाबत मोठी अपडेट आली समोर, जाणून घ्या मार्ग...

Electricity Supply: मुंबईसह राज्याची विजेची मागणी घसरली, सुमारे ३-४ हजार मेगावॉटची घट; नेमकं कारण काय? वाचा...

Beed News : बीडमधील गेवराईत धनगर आरक्षणाचा बळी, एसटी प्रवर्गात समावेश होत नसल्याने मादळमोहीच्या युवकाने घेतला गळफास

AUS vs IND: मोहम्मद सिराजची सुपरमॅनसारखी फिल्डिंग! बाऊंड्रीजवळ एकाच हाताने चेंडू पकडून आडवला सिक्स, पाहा Video

SCROLL FOR NEXT