India vs England 1st Test  sakal
क्रीडा

Ind vs Eng : इंग्लंड-0, तर भारत-3...; कॅप्टन स्टोक्स सपशेल गंडला! 13 षटकात इंग्रजांचा झाला गेम

India vs England 1st Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबादमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला

Kiran Mahanavar

India vs England 1st Test :

हैदाराबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबादमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिला दिवस भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांच्या नावावर राहिला. पहिल्या डावाच्या आधारे भारत इंग्लंडच्या 127 धावांनी मागे आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाने पहिल्या डावात 246 धावा केल्या.

भारताने पहिल्या डावात एक विकेट गमावून 119 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा २४ धावा करून बाद झाला. यशस्वी जैस्वाल 76 धावांवर नाबाद असून शुभमन गिल 14 धावांवर नाबाद आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताने आतापर्यंत पहिल्या डावात केवळ 23 षटके फलंदाजी केली. आणि फक्त एक विकेट गमावली. टीम इंडियाकडे अजूनही तिन्ही रिव्ह्यू बाकी आहेत. पण इंग्लंड संघाने सामन्याच्या 13व्या षटकात तिन्ही रिव्ह्यू गमावले आहेत. आता या पहिल्या डावात पंचांना आव्हान देण्यासाठी त्याच्याकडे कोणताही रिव्ह्यू शिल्लक नाही. आणि भारतीय संघाच्या अजून 9 विकेट बाकी आहेत. त्यामुळे कर्णधार बेन स्टोक्सची चिंता नक्कीच वाढली आहे.

भारताकडून पहिल्या डावात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल सलामीला आले. दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीपासूनच इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि आक्रमक खेळला. मात्र जॅक लीचच्या चेंडूवर कर्णधार रोहित शर्मा 24 धावा करून बाद झाला. यानंतर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. जैस्वाल आणि गिल यांनी पहिल्या दिवशी डाव 119 पर्यंत नेला आणि नाबाद माघारी परतले.

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 246 धावांत गारद झाला. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 70 धावांची खेळी खेळली. जॉनी बेअरस्टोने 37 धावा केल्या. तर भारताकडून रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांनी आतापर्यंत सर्वाधिक 3-3 विकेट घेतल्या आहेत. तर अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांना 2-2 यश मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT