England Cricket Team Corona Updates esakal
क्रीडा

इंग्लंडचे प्रशिक्षक विलगीकरणात, संघातील कोरोनाग्रस्त वाढले

अनिरुद्ध संकपाळ

सिडनी : अ‍ॅशेस मालिका (Ashes Series) खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात आलेल्या इंग्लंड संघातील (England Cricket Team) एका पाठोपाठ एक सदस्य कोरोनाग्रस्त (Corona Positive) होत आहेत. आतपर्यंत इंग्लंड संघातील सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. इंग्लंड संघाचे प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड (Chris Silverwood Isolation) यांच्या कुटुंबातील सदस्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे ते अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटीला मुकणार आहेत.(England Cricket Team Corona Updates)

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड संघातील आतापर्यंत सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात तीन सपोर्ट स्टाफमधील सदस्य आणि चार कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) प्रसिद्ध केलेल्या नव्या वक्तव्यात सिल्वरवूड सिडनी कसोटीला मुकणार असल्याचे सांगितले.

'इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत मेलबर्नमध्ये 10 दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ते 5 जानेवारी 2022 मध्ये सिडनीत होणाऱ्या चौथ्या कसोटीला ते मुकणार आहे.' असे वक्तव्य इंग्लंड क्रिकेट बोर्डाने प्रसिद्ध केले.

सिडनी कसोटीसाठी (Sydney Test) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ विशेष विमानाने सिडनीसाठी शुक्रवारी सिडनीसाठी रवाना होणार आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या वक्तव्यात ही माहिती दिली आहे. ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिकेतील पहिले तीन सामने जिंकून मालिकेत 3 - 0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. (Chris Silverwood Isolation)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

Live Updates Marathi: पेपरफुटीच्या मुद्द्यावर सभागृहातच चर्चा आवश्यक- जेपी नड्डा

FDA Crime : अस्वच्छतेमुळे १० हॉटेल, बेकरींचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT