England Team Ware Black Arm Band In T20World Cup Final Against Pakistan esakal
क्रीडा

PAK vs ENG : पाकिस्तानविरूद्धच्या फायनलमध्ये इंग्लंडने दंडावर का लावल्या काळ्या फिती?

अनिरुद्ध संकपाळ

England Team Ware Black Arm Band : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकप 2022 चा अंतिम सामना आज इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, इंग्लंडचा संघ मैदानावर काळ्या फिती बांधून दाखल झाला. त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंनी दंडावर काळ्या फिती का बांधल्या आहेत असा प्रश्न पडला होता. इंग्लंड संघाने या काळ्या फिती डेव्हिड इंग्लिश यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपल्या दंडावर काळ्या फिती बांधल्या आहेत.

डेव्हिड इंग्लिश हे इंग्लिश क्रिकेटचे गॉडफादर म्हणून ओळखले जातात. त्यांनी बनब्युरी स्कूल फेस्टिव्हलद्वारे जवळपास 1000 पेक्षा जास्त प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंची कारकिर्द फुलावी म्हणून मदत केली. यात 125 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा देखील समावेश आहे. अशा डेव्हिड इंग्लिश यांचे वयाच्या 76 व्या वर्षी ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इंग्लंड संघाने अंतिम सामन्यात दंडावर काळ्या फिती बांधल्या आहेत.

दरम्यान, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने ट्विट करून आपले अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केले. इसीबी ट्विटमध्ये म्हणते की, 'डेव्हिड इंग्लिश यांच्या निधनाचे वृत्त ऐकून इसीबीला दुःख झाले आहे. त्यांनी खेळासाठी खूप काही केलं आहे. इंग्लंड पुरूष संघातील अनेक खेळाडूंच्या वृद्धीसाठी महत्वाची भुमिका बजावली आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि मित्रपरिवाराच्या दुःखात सामिल आहोत.'

इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने देखील ट्विट केले की, 'डेव्हिड इंग्लिश यांच्या निधनाच्या वृत्ताने दुःख झाले. आयुष्टात भेटलेले एक महान व्यक्तीमत्व. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण खूप मस्त होते. इंग्लंडला त्यांच्या बनब्युरी फेस्टिव्हलद्वारे दर्जेदार क्रिकेटपटू देणारे व्यक्तीमत्व. त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

Cancer Care Support: डॉक्टरांच्या मते सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोग पुन्हा उद्भवू शकतो; अशा वेळी 'केअरगिव्हर' म्हणून तुमची जबाबदारी काय?

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये टेम्पो दुचाकीवर आदळून एकाचा मृत्यू

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

SCROLL FOR NEXT