England vs India 1st ODI  Live Cricket Score Highlights Rohit Sharma Jasprit Bumrah Mohammed Shami
England vs India 1st ODI Live Cricket Score Highlights Rohit Sharma Jasprit Bumrah Mohammed Shami  esakal
क्रीडा

ENG vs IND 1st ODI : रोहितचे दमदार अर्धशतक; भारताचा मोठा विजय

अनिरुद्ध संकपाळ

लंडन : भारताने इंग्लंडचा पहिल्या वनडे सामन्यात 10 विकेट राखून पराभव करत मालिकेत 1 - ० अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्माने नाबाद 76 तर शिखर धवनने नाबाद 31 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने 19 धावात 6 तर मोहम्मद शमीने 3 विकेट घेतल्या.

इंग्लंडने ठेवलेल्या 111 धावांचा पाठलाग करताना भारताची सलामी जोडी शिखर धवन आणि रोहित शर्माने सवाध सुरूवात केली. दरम्यान, कर्णधार रोहित शर्माने सेट झाल्यानंतर आक्रमक खेळी करण्यास सुरूवात केली. दुसऱ्या बाजूने शिखरने त्याला सावध साथ दिली.

रोहित शर्माने दमदार अर्धशतक ठोकले. या जोडीने नाबाद शतकी भागीदारी रचली. त्यातील 60 टक्क्यांपेक्षाही जास्त वाटा रोहितने उचलला. अखेर या दोघांनी इंग्लंडचे 111 धावांचे आव्हान 19 षटकात पार करत भारताला नाबाद विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजाली मोठे खिंडार पाडले. जसप्रीत बुमराहने 19 धावात 6 तर मोहम्मद शमीने 31 धावात 3 बळी घेत इंग्लंडचा डाव 110 धावांवर संपुष्टात आणला.

जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्याच आणि सामन्याच्या दुसऱ्या षटकात इंग्लंडला दोन धक्के दिले. त्याने जेसन रॉय (0) पाठोपाठ जो रूटला देखील शुन्यावर बाद करत इंग्लंडची अवस्था 2 बाद 6 धावा अशी केली. सप्रीत बुमराहने दुसऱ्याच षटकात इंग्लंडला दोन धक्के दिल्यानंतर पुढच्याच तिसऱ्या षटकात मोहम्मद शमीने इंग्लंडचा स्टार खेळाडू बेन स्टोक्सला देखील शुन्यावर बाद केले.

जसप्रीत बुमराहने 20 चेंडूत 7 धावा करणाऱ्या जॉनी बेअरस्टोला देखील पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत इंग्लंडची अवस्था 5.3 षटकात 4 बाद 17 धावा अशी केली. जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या फलंदाजीला चांगलेच खिंडार पाडले. त्याने सामन्याच्या आठव्या षटकात इंग्लंडचा पाचवा फलंदाज बाद करत इंग्लंडचा निम्मा संघ 26 धावात माघारी धाडला. बुमराहने लिम व्हिंगस्टोनच्या रूपात आपली चौथी शिकार केली.

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने इंग्लंडलची अवस्था 5 बाद 26 धावा अशी केली असताना मोईन अली आणि जॉस बटलर यांनी इंग्लंडचा डावा सारवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसिद्ध कृष्णाने मोईन अलीला 14 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. शमीने 30 धावा करून झुंज देणाऱ्या बटलरला बाद करत इंग्लंडला मोठा धक्का दिला.

बटलर बाद झाल्यानंतर डेव्हिड विली (21) आणि ब्रँडन कार्से (15) यांनी इंग्लंडला शंभरी पार करून दिली. मात्र जसप्रीत बुमराहने या दोघांनाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत इंग्लंडचा डाव 110 धावांवर संपुष्टात आणला.

Highlights

रोहितचे दमदार अर्धशतक

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने इंग्लंडच्या 111 धावांचा पाठलाग करताना दमदार अर्धशतकी खेळी केली.

IND 46-0 : रोहित - शिखरची आश्वासक सुरूवात

इंग्लंडच्या 110 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी आश्वासक सुरूवात केली. या दोघांनी भारताला 8 व्या षटकात 46 धावांपर्यंत पोहचवले.

बुमराहचा सहावा बळी

जसप्रीत बुमराहने 21 धावा करणाऱ्या डेव्हिड विलीला बाद करत आपला सामन्यातील सहावा फलंदाज बाद केले. याचबरोबर इंग्लंडचा डाव 110 धावात संपुष्टात आला.

103-9 : जसप्रीत बुमराहचा पंजा

जसप्रीत बुमराहने आजच्या सामन्यात आपली पाचवी शिकार केली. त्याने ब्रँडन कार्सेला 15 धावांवर बाद करत इंग्लंडचा 9 वा फलंदाज माघारी धाडला.

68-8 : शमीने केली ओव्हरटनची शिकार

मोहम्मद शमीने ग्रेग ओव्हरटर्नला शुन्यावर बाद करत इंग्लंडला आठवा धक्का दिला.

59-7 : इंग्लंडला मोठा धक्का

मोहम्मद शमीने इंग्लंडला मोठा धक्का दिला. त्याने 30 धावा करून एकाकी झुंज देणाऱ्या जोस बटलरला बाद केले.

53-6 : प्रसिद्ध कृष्णाने उघडले खाते

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने इंग्लंडलची अवस्था 5 बाद 26 धावा अशी केली असताना मोईन अली आणि जॉस बटलर यांनी इंग्लंडचा डावा सारवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसिद्ध कृष्णाने मोईन अलीला 14 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.

26-5 : बुमारहने पाडले खिंडार

जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या फलंदाजीला चांगलेच खिंडार पाडले. त्याने सामन्याच्या आठव्या षटकात इंग्लंडचा पाचवा फलंदाज बाद करत इंग्लंडचा निम्मा संघ 26 धावात माघारी धाडला. बुमराहने लिम व्हिंगस्टोनच्या रूपात आपली चौथी शिकार केली.

17- 4 : बेअरस्टो देखील पॅव्हेलियनमध्ये परतला

जसप्रीत बुमराहने 20 चेंडूत 7 धावा करणाऱ्या जॉनी बेअरस्टोला देखील पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत इंग्लंडची अवस्था 5.3 षटकात 4 बाद 17 धावा अशी केली.

7-3 : इंग्लंडचे रथी महारथी भोपळाही न फोडता माघारी

जसप्रीत बुमराहने दुसऱ्याच षटकात इंग्लंडला दोन धक्के दिल्यानंतर पुढच्याच तिसऱ्या षटकात मोहम्मद शमीने इंग्लंडचा स्टार खेळाडू बेन स्टोक्सला देखील शुन्यावर बाद केले.

6-2 : जो रूट बाद, इंग्लंडला दुसऱ्या षटकात दुसरा धक्का

जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्याच आणि सामन्याच्या दुसऱ्या षटकात इंग्लंडला दोन धक्के दिले. त्याने जेसन रॉय पाठोपाठ जो रूटला देखील शुन्यावर बाद करत इंग्लंडची अवस्था 2 बाद 6 धावा अशी केली.

6-1: बुमराहने इंग्लंडला दिला पहिला धक्का

जसप्रीत बुमराहने दुसऱ्याच षटकात इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्याने जेसन रॉयचा शुन्यावर त्रिफळा उडवला.

पहिल्या सामन्याला विराट कोहली मुकला

इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात एक बदल असून विराट कोहली दुखापतीमुळे पहिल्या वनडे सामन्याला मुकला आहे. त्याच्या जागी श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार आहे. अर्शदीप सिंह देखील पोटाचा स्नायू दुखावल्यामुळे तोही पहिल्या वनडेला मुकला आहे.

इंग्लंड - भारत वनडे मालिकेला सुरूवात

भारत आणि इंग्लंड याच्यातील वनडे मालिकेला सुरूवात होत आहे. पहिला सामना ओव्हलवर होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: भारतीय नागरिकच माझे उत्तराधिकारी- पंतप्रधान मोदी

Karveer Police : गर्भपाताच्या गोळ्यांचे रॅकेट थेट परराज्यातून; कोल्हापुरात बिनदिक्कतपणे गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री?

HSC RESULT: कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी CA, CS व्यतिरिक्त करा 'हे' कोर्स

Cooking Tips: भाजीत तिखट जास्त झाले तर 'असे' करा कमी, चवही होईल द्विगुणित

HSC Result 2024 : मार्क कमी पडले म्हणून मुलं नाराज आहेत, पालकांच्या या गोष्टी मुलांना डिप्रेशनमध्ये जाण्यापासून वाचवतील

SCROLL FOR NEXT