IND vs ENG Twittter
क्रीडा

इंग्लंडने स्वत:च्या पायावर मारुन घेतली कुऱ्हाड; पाहा पुरावा (VIDEO)

सगळ्यांच्या नजरा होत्या त्या रिषभ पंतवर. पण तो बाद झाल्यावर इंग्लंडने लॉर्ड्सचे मैदान मारल्याची स्वप्ने बघायलाही सुरुवात केली असेल.

सुशांत जाधव

लॉर्ड्सच्या मैदानावर पहिला दिवस सोडला तर दुसरा, तिसरा आणि चौथा दिवस इंग्लंडने गाजवला. चौथ्या दिवसाअखेर भारतीय संघ ज्या स्थितीत होता त्यावेळी विजयाची स्वप्ने सोड पण सामना अनिर्णित राखण्यासाठी भारताने काय करायला हवे, अशी परिस्थिती होती. पुजारा आणि अजिंक्य रहाणेनं चौथ्या दिवशी केलेल्या शतकी भागीदारीमुळे भारतीय संघ अडचणीतून बाहेर आला खरा. पण पाचव्या दिवशी भारतीय संघाला कोण तारणार? हा मोठा प्रश्न टीम इंडियासमोर होता. सगळ्यांच्या नजरा होत्या त्या रिषभ पंतवर. पण तो बाद झाल्यावर इंग्लंडने लॉर्ड्सचे मैदान मारल्याची स्वप्ने बघायलाही सुरुवात केली असेल.

इंग्लंडचा संघ मजबूत स्थितीत असल्यामुळे त्यांनी हे स्वप्न पाहणं सहाजिकच होते. पण त्यांनी एक मोठी चूक केली. ती चूक होती भारतीय लोअर ऑर्डरला शुल्लक समजण्याची. क्रिकेटच्या पंढरीत इंग्लंडचे खेळाडू आणि भारतीय खेळाडू यांच्यात शाब्दिक खेळ रंगल्याचे चित्रही क्रिकेट चाहत्यांनी अनुभवले. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात इंग्लंडचा अनुभवी जलदगती गोलंदाजाला बुमराहने बाउन्सर आणि यॉर्करचा मारा करुन हैराण करुन सोडल्याचे पाहायला मिळालं. ही गोष्ट लक्षात ठेवून इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय तळाच्या फलंदाजांना जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

जोस बटलर आणि मार्क वूडने जसप्रित बुमराह बॅटिंग करत असताना केलेली शाब्दिक वादावादीशिवाय अँडरसन आणि कंपनी बुमराहची विकेट घेण्याचे सोडून त्याने मारलेल्या बाउन्सर आणि यॉर्करची परत फेड करण्याच्या बदल्याच्या भावनेतून खेळताना दिसले. परिणामी त्यांची लाइन-लेंथ बिघडली. याचा फायदा भारतीय संघाला झाला. शमी आणि बुमराहने नवव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी करत सामन्याचे चित्र पलटले. भारतीय संघाच्या 7 गड्यांना तंबूत पाठवल्यानंतर जो संघ मालिकेत आघाडीची स्वप्न बघत होता त्या संघावर सामना कसा वाचववा हा पेच निर्माण झाला. तळाच्या फलंदाजांना किरकोळ समजून आणि बदल्याच्या भावनेतून भरकटलेल्या रणनितीमुळे इंग्लंडने स्वत:च्या पायावार कुऱ्हाड मारण्याचा प्रकारच दिसून आला.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये भरमैदानात रंगलेल्या शाब्दिक वादावादीचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल हाताना दिसते. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज अँडरसन, मार्क वूड आणि बटलर विरुद्ध बुमराह असे काहीचे चित्र पाचव्या आणि अखेरच्या दिवसाच्या खेळात पाहायला मिळाले. पंचांच्या मध्यस्थीनंतर पुन्हा ते आपापली जबाबदारी पार पाडताना दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT