England vs India 5th Test Live Cricket Score Highlights
England vs India 5th Test Live Cricket Score Highlights esakal
क्रीडा

ENG vs IND : पंतचे शतक - जडेजा शतकाच्या उंबरठ्यावर; दिवसअखेर भारताच्या 338 धावा

अनिरुद्ध संकपाळ

बर्मिंगहम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी (रिशड्युल) सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा हा निर्णय जेमी अँडरसनने सामन्याच्या सातव्या षटकातच योग्य ठरवला. त्याने सलामीवीर शुभमन गिलला 17 धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला. (England vs India 5th Test Live Cricket Score Highlights)

रोहितच्या अनुपस्थिती सलामीला आलेल्या चेतेश्वर पुजाराने हनुमा विहारीसोबत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र अँडरसनने पुजाराला 13 धावांवर बाद करत भारताचा दुसरा सलामीवीर देखील माघारी धाडला. दरम्यान, विराट कोहली मैदानावर आला.

मात्र त्यानंतर लगेचच पावसाला सुरूवात झाली. यामुळे पंचांनी देखील लवकर उपहाराची घोषणा केली. यानंतर पाऊसाने उसंत घेतल्यानंतर सामन्याला पुन्हा सुरूवात झाली. मात्र ही सुरूवात भारतासाठी घातक ठरली. मॅटी पॉट्सने 20 धावा करून सेट होण्याच्या प्रयत्न करणाऱ्या विहारीला पायचित पकडले.

यानंतर विराट कोहलीने डावाची सूत्रे हातात घेण्याचा प्रयत्न केला. तो चांगल्या लयीत दिसत असतानाच पॉट्सचा एक चेंडू सोडू की खेळू या द्विधा मनस्थिती तो 11 धावांवर बोल्ड झाला. विराटनंतर श्रेयस अय्यर देखील 15 धावांची भर घालून परतला. त्याला जेमी अँडरसनने बाद कले.

मात्र त्यानंतर ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) या डावखुऱ्या जोडीने भारताचा डाव 5 बाद 98 धावांपासून सावरायला सुरूवात केली. ऋषभ पंतने आक्रमक फलंदाजी करत धावांची गती वाढवली. तर दुसऱ्या बाजूने जडेजाने त्याला सावध पवित्रा घेत चांगली साथ दिली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी करत दिवसाच्या तिसऱ्या सत्रात भारताला 200 चा टप्पा पार करून दिला.

दरम्यान, ऋषभ पंतने आपले कसोटीतील पाचवे शतक ठोकले. त्याने 89 चेंडूतच शतकी खेली पूर्ण केली. त्या पाठोपाठ जडेजाने देखील अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी सहाव्या विकेटची भागीदारी 150 पार नेली तसेच भारताच्या 250 धावा देखील धावफलकावर लावले. दमलेल्या इंग्लिश गोलंदाजांनी त्यानंतरही पंत आणि जडेजाने धुलाई कामय ठेवत आपली भागीदारी द्विशतकापर्यंत नेली. याचबरोबर भारतानेही 300 चा टप्पा पार केला.

अखेर ऋषभ पंतचा झंजावात पार्ट टाईम गोलंदाज जो रूटने रोखला. त्याने पंतला 146 धावांवर बाद करत भारताला सहावा धक्का दिला. पंत बाद झाल्यानंतर आलेल्या शार्दुल ठाकूर 1धावेची भर घालून माघारी गेला. अखेर रविंद्र जडेजाने दिवसचा खेळ संपेपर्यंत भारताला 7 बाद 338 धावा केल्या होत्या. खेळ थांबला त्यावेळी जडेजा 83 तर मोहम्मद शमी शुन्यावर नाबाद होते.

ENG vs IND 5th Test Highlights :

IND 338/7 (73) : पहिल्या दिवसाचा खेळ संपला

भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी 7 बाद 338 धावा केल्या होत्या. भारताकडून ऋषभ पंतने 146 तर रविंद्र जडेजाने नाबाद 83 धावा केल्या. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 222 धावांची भागीदारी रचली.

323-7 : शार्दुल ठाकूर 1 धावेची भर घालून परतला

320-6 : पंतचे दीडशतक हुकले

अखेर ऋषभ पंतचा झंजावात पार्ट टाईम गोलंदाज जो रूटने रोखला. त्याने पंतला 146 धावांवर बाद करत भारताला सहावा धक्का दिला. पंतने 111 चेंडूत 146 धावा केल्या.

पंत - जडेजाची द्विशतकी भागीदारी

ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजाने दमलेल्या इंग्लंड गोलंदाजांची चांगलीच पिसे काढत सहाव्या विकेसाठी नाबाद द्विशतकी भागीदारी रचली. याचबरोबर भारताने 300 चा टप्पा पार केला.

ऋषभ पंतचे आक्रमक शतक, जडेजाचे अर्धशतक

भारताचा डाव सावरणाऱ्या ऋषभ पंतने 89 चेंडूत शतक ठोकून मजबूत स्थितीत नेले. त्या पाठोपाठ रविंद्र जडेजाने देखील आपले अर्धशतक पूर्ण करत भागीदारी 150 च्या पार नेली.

भारत 200 पार 

ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजाने सहाव्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी रचत संघाला 200 धावांचा टप्पा पार करून दिला.

चहापानापर्यंत भारताच्या 5 बाद 174 धावा

ऋषभ पंतचे दमदार अर्धशतक,

अडचणीत सापडलेल्या भारताला सावरत ऋषभ पंतने कसोटीतले 10 वे अर्धशतक ठोकले.

पंत आणि जडेजाने डाव सावरला 

भारताची अवस्था 5 बाद 98 धावा अशी अवस्था झाल्यानंतर ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजाने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी 54 चेंडूत अर्धशतकी भागीदारी रचत संघाला 150 च्या जवळ पोहचवले.

98-5 : जेम्स अँडरसनने केली तिसरी शिकार

जेम्स अँडरसनने श्रेयस अय्यरला 15 धावांवर बाद करत पाचवा धक्का दिला. अँडरसनची ही आतापर्यंतची तिसरी शिकार होती.

71-4 :पॉट्सने दिला भारताला मोठा धक्का

मॅटी पॉट्सने हनुमा विहारी पाठोपाठ 11 धावा करणाऱ्या विराट कोहलीला देखील बोल्ड करत भारताला चौथा धक्का दिला.

64-3 : भारताची टॉप ऑर्डर पॅव्हेलियनमध्ये 

मॅटी पॉट्सने भारताला तिसरा धक्का दिला. त्याने 20 धावा करणाऱ्या हनुमा विहारीला पायचित बाद केले.

पावसाने घेतली उसंत

पावसाने उसंत घेतली असून मैदानावरील पाणी काढण्यासाठी ग्राऊंड्समन काम करत आहेत. सामना 6.45 ला सुरू होण्याची शक्यता आहे.

IND 53/2 (20.1) : सामन्यात पावसाचा व्यत्यय

चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर आलेल्या विराट कोहलीने सातव्या चेंडूवर आपले खाते उघडले मात्र त्यानंतर पावसाला सुरूवात झाल्याने सामना थांबवण्यात आला. त्यानंतर पंचांनी उपहाराची घोषणा केली.

46-2 : अर्धशतक पूर्ण होण्यापूर्वीच भारताला दोन धक्के

जेम्स अँडरसनने भारताची भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराला 13 धावांवर बाद करत भारताला दुसरा धक्का दिला.

43-1 (15 Ov) : भारताची सावध सुरूवात

सलामीवीर शुभमन गिल बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारीने भारताचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला.

 27-1 : अँडरसनने दिला भारताला पहिला धक्का 

जेम्स अँडरसनने भारताला पहिला धक्का दिला. त्याने 17 धावा करणाऱ्या शुभमन गिलला स्लीपमध्ये झेल देण्यास भाग पाडले.

भारताच्या 5 षटकात 18 धावा 

भारताचने पहिल्या डावाची सावध सुरूवात करत पाच षटकात 18 धावांवपर्यंत मजल मारली.

भारतीय संघाची वेगवान रणनीती 

भारताने एजबेस्टन कसोटीसाठी चार वेगवान आणि एक फिरकी गोलंदाज घेऊन मैदानात उतरण्याची रणनीती अवलंबली आहे. तर रोहितच्या अनुपस्थितीत चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल डावाची सुरूवात करणार आहेत.

इंग्लंडने नाणेफेक जिंकली

एजबेस्टन कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT