England Vs India 5th Test What Is Bazball Rahul Dravid Also Don't Know  ESAKAL
क्रीडा

Bazball | पाचव्या कसोटीत 'बॅझबॉल'चीच चर्चा, द्रविड विचारतोय काय आहे प्रकरण?

अनिरुद्ध संकपाळ

बर्मिंगहम : भारत आणि इंग्लंड (England Vs India) यांच्यातील पाचव्या सामन्यात इंग्लंडने भारताचा सात गडी राखून पराभव केला. सामन्यावर पहिले तीन दिवस भारताचे वर्चस्व होते. मात्र चौथ्या दिवशी इंग्लंडने सामन्यात पुनरागम केले आणि पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रातच भारताचा विजयी घास हिरावून घेतला. भारताने ठेवलेल्या 378 धावांचा 77 षटकातच पाठलाग केला. इंग्लंडकडून जो रूटने (Joe Root) नाबाद 142 तर जॉनी बेअरस्टोने नाबाद 114 धावांची शतकी खेळी केली. या कसोटी मालिकेत एक शब्द खूप चर्चेत आला तो म्हणजे 'बॅझबॉल' (Bazball)'

बॅझबॉल' म्हणजे काय? गेल्या 18 महिन्यापासून इंग्लंड सातत्याने कसोटी सामना हरत होती. अॅशेस मालिकेत पराभव, भारतात देखील पराभव. त्यानंतर वेस्ट इंडीज दौऱ्यावर देखील इंग्लंडच्या पदरी पराभवच पडला. त्यानंतर इंग्लंड संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅक्युलमने (Brendon Mccullum) आपल्या खांद्यावर घेतली. बॅझबॉल ही एक माईंडसेट आहे. या माईंटसेटनेच इंग्लंडला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढले. बॅझ हे मॅक्यूलमचे टोपण नाव आहे. यावरूनच बॅझबॉल हे नाव तयार झाले. मॅक्युलने प्रशिक्षक होताच इंग्लंडला चारी कसोटी सामन्यात विजय मिळाला.

राहुल द्रविडही विचारतोय काय आहे बॅझबॉल?

भारताच्या पराभवानंतर संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडला (Rahul Dravid) एका पत्रकाराने बॅझबॉल बाबत प्रश्न विचरला. त्यावेळी त्याने मला नाही माहिती हे काय आहे असे उत्तर दिले आणि सर्व पत्रकार हसू लागले. द्रविड पुढे म्हणाला की, 'मी निश्चित सांगू शकतो की गेल्या काही महिन्यांपासून इंग्लंड ज्या प्रकारे क्रिकेट खेळत आहे तू खूप चांगले आहे. ते धावांचा पाठलाग करण्यात यशस्वी राहिले आहेत. इंग्लंडमध्ये चौथ्या डावात धावांचा पाठलाग करणे सोपे नाही. जो कोणी या प्रकराचे आक्रमक क्रिकेट खेळू इच्छितो ते क्रिकेट खूप साऱ्या खेळाडूंवर अवलंबून असते. ते यावेळी कोणत्या फॉर्ममध्ये आहेत हेही महत्वाचे असते. जर खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असतील तर ते सकारात्मक खेळ करतात. जसे पहिल्या डावात ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा खेळत होते.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: द. आफ्रिकेच्या मारिझान कापने झुलन गोस्वामीचा विश्वविक्रम मोडला! सेमीफायनलमध्ये ५ विकेट्स घेत घडवला इतिहास

एसटी बसमधून एमडी ड्रग्ज घेऊन येणारा मोहम्मद अझहर कुरेशी सोलापुरात जेरबंद! सापळा रचून बस स्थानकावर पकडले; पुरवठादारास व्हॉट्‌सॲप कॉलवरून करायचा संपर्क

Nilesh Ghaywal : गुंड घायवळ लंडनमध्ये; यूके हायकमिशनची माहिती, प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती

Kalyan Crime: दोन वर्षांच्या चिमुकलीवर कल्याण पोलिसांनी दाखल केला गुन्हा; खुनाचा प्रयत्न केल्याचा ठपका

Women's World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच मिळवलं फायनलचं तिकीट! इंग्लंडचा सेमीफायनलमध्ये उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT