IND W vs ENG W sakal
क्रीडा

IND W vs ENG W: शेवटच्या टी-20 सामन्यात भारताचा पराभव; यजमानांनी मालिका 2-1 ने जिंकली

इंग्लंडने शेवटच्या सामन्यात भारताचा 7 गडी राखून पराभव केला

Kiran Mahanavar

India vs England Women T-20 : इंग्लंडच्या महिला संघाने शेवटच्या T20 सामन्यात 7 गडी राखून मोठा विजय नोंदवत 3 सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली आहे. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ प्रथम खेळताना केवळ 122 धावाच करू शकला. यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोषने सर्वाधिक 33 धावा केल्या. प्रत्युत्तरात यजमान इंग्लिश संघाने 18.2 षटकांत 3 गडी राखून लक्ष्य गाठले. सलामीवीर फलंदाज सोफिया डंकलेने सर्वाधिक 49 धावा केल्या. आता दोन्ही देशांदरम्यान 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना 18 सप्टेंबर रोजी होव्ह येथे होणार आहे.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने 35 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. शेफाली वर्मा 5, स्मृती मानधना 9 आणि हरमनप्रीत कौरही 5 धावा करून बाद झाली. 52 धावांवर 6 विकेट पडल्यानंतर दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष यांनी संघाची धुरा सांभाळली. दीप्तीने 25 चेंडूत 24 धावा केल्या. 9व्या क्रमांकावर उतरलेल्या पूजा वस्त्राकरने 11 चेंडूत नाबाद 19 धावा करत धावसंख्या 120 च्या पुढे नेली.

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंड संघाला सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली. इंग्लंडने पहिल्या विकेटसाठी 70 धावा जोडल्या. डॅनियल व्याटने 22 तर सोफिया डंकलेने 49 धावा केल्या. याशिवाय अॅलिस कॅप्सीने नाबाद 38 धावा केल्या. हे लक्ष्य गाठण्यात इंग्लंडला फारशा अडचणी आल्या नाहीत. भारताकडून स्नेह राणा, पूजा वस्त्राकार आणि राधा यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. T20 मालिका गमावल्यानंतर भारताला इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या मालिकेतील सामने 18, 21 आणि 24 सप्टेंबर रोजी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतावर शंभर टक्के टॅरिफ लावण्याच्या प्रस्तावाला अमेरिकन सीनेटर्सचा तीव्र विरोध; म्हणाले, ''पायावर धोंडा मारुन घेण्यासारखे...''

Uttar Pradesh: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्लॅन B! अखिलेश यादव यांच्याशी चर्चेनंतर आघाडी होणार का?

Creta Car Accident : क्रेटा कार विहिरीत कोसळली; दोघांना बाहेर काढण्यात यश तर काहींचा शोध सुरु, पद्मावती गावाजवळील घटना

Milk Rate Increase : दूध दरात दोन रुपयांची वाढ; दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महागणार

Pune News : झाडणकामावरून कर्मचाऱ्यांची झाडाझडती; कामात सहकार्य करण्याची तंबी

SCROLL FOR NEXT