England Women vs India Women
England Women vs India Women BCCI Twitter
क्रीडा

END W vs IND W : मितालीच्या नाबाद अर्धशतकामुळे शेवट गोड झाला!

सुशांत जाधव

England Women vs India Women 3rd ODI : कर्णधार मिताली राजचे नाबाद अर्धशतक आणि तिला तळाच्या फलंदाजीत स्नेह राणानं दिलेली साथ याच्या जोरावर भारतीय संघाने तिसऱ्या वनडेत विजय नोंदवला. शेवटच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने 4 विकेट्स राखून 220 धावांचे लक्ष पार केले. पहिल्या दोन वनडेत अर्धशतकी खेळी करणाऱ्या मितालीने इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत सलग तिसरे अर्धशतक झळकावले. (England Women vs India Women 3rd ODI Deepti Sharma Smriti Mandhana Shafali Verma Mithali Raj Harmanpreet Kaur))

या धावांचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाची सुरुवात खराब झाली. धावफलकावर अवघ्या 46 धावा असताना शफाली वर्मा 19 धावा करुन माघारी फिरली. त्यानंतर स्मृती मानधनाने 49 धावांची उपयुक्त खेळी केली. जेमिमा रॉड्रिग्ज अवघ्या 4 धावा करुन परतल्यावर मितालीने सामन्याचे सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. हरमनप्रित कौर 16, दीप्ती शर्मा 18 धावा करुन परतल्यानंतर कसोटी वाचवण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या स्नेह राणाने मितालीला साथ दिली. 22 चेंडूत 24 धावांची खेळी करुन ती माघारी फिरली. मिताली राजने 86 चेंडूत 8 चौकाराच्या मदतीने 75 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

वनडे मालिका गमावलेल्या भारतीय महिला संघ इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात शेवट गोड करण्याच्या इराद्याने मैदानात उतरलाय. पहिल्या दोन सामन्यात टॉसवेळी अपयशी ठरलेली मिताली राज हिने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी 47- 47 ओव्हर्सचा खेळवण्यात आला.

दीप्ति शर्माने घेतलेल्या सर्वाधिक तीन विकेट आणि तिला इतर गोलंदाजांची मिळालेली साथ याच्या जोरावर भारतीय महिला संघाने इंग्लंडच्या महिला संघाला 219 धावांत रोखले. अखेरच्या षटकात इंग्लंडने आपली शेवटची विकेटही गमावली. भारतीय महिला संघासमोर आता 47 षटकात 220 धावांचे आव्हान आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली मागील दोन्ही सामन्यात एकटी लढताना दिसली. या सामन्यात इतर फलंदाजांनी आपल्यातील क्षमता दाखवणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT