England World Cup Winner Captain EOIN MORGAN Retire From International Cricket esakal
क्रीडा

इंग्लंडला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या इऑन मॉर्गनने घेतली निवृत्ती

अनिरुद्ध संकपाळ

लंडन : इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार इऑन मॉर्गन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंडने 2019 मध्ये आपला पहिला वहिला वर्ल्ड कप त्याच्याच नेतृत्वाखाली जिंकला होता. (England World Cup Winner Captain EOIN MORGAN Retire From International Cricket)

इऑन मॉर्गन निवृत्तीची घोषणा करताना म्हणाला की, 'काळजीपूर्वी सखोल विचार करून सल्ला घेतल्यानंतर मी तात्काळ प्रभावाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर करतो. माझ्या कारकिर्दिचा काळ हा नक्तीच आनंददायी फलदायी ठरला आहे. मात्र आता मला थांबलं पाहिजे असं वाटतं.'

तो पुढे म्हणाला की 'आयर्लंडपासून मी माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दिची सुरूवात केली. तेथून 2019 चा वर्ल्डकप जिंकेपर्यंत माझ्या कुटुंबियांची मला चांगली साथ लाभली. एका खेळाडूच्या दृष्टीने ती फार महत्वाची असते. माझी आई, वडील, पत्नी, तारा आणि जरभरात विखुरलेले आमचे कुटुंब तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार. तुमच्याशिवाय इथंवरचा प्रवास शक्य झाला नसता.'

याचबरोबर मॉर्गनने आपल्या संघातील खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे आणि चाहत्यांचे देखील आभार मानले. तो म्हणाला की, 'मी स्वतःला नशिबवान समजतो की मला दोन वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाचा भाग होता आलं. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या संघाचे भवितव्य उज्वल आहे. आता आपल्याकडे चांगला अनुभव आहे, शक्तीशाली संघ आहे. मी इंग्लंडचा पुढचा प्रवास पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे.'

इऑन मॉर्गनने 225 एकदिवसीय सामन्यात 6,957 धावा केल्या आहेत. यात 13 शतकांचा देखील समावेश आहे. त्याने 39.74 च्या सरासरीने धावा केल्या. त्याने 126 सामन्यात इंग्लंडचे नेतृत्व केले. त्यात 76 सामन्यात संघाने विजय मिळवला. त्याचे विनिंग पर्सेंटेज हे 60 टक्के इतके आहे. इंग्लंडच्या आतापर्यंतच्या वनडे कर्णधारांपैकी त्याचे विनिंग पर्सेंटेज सर्वाधिक आहे.

त्याने इंग्लंडने टी 20 क्रिकेटमध्ये 72 वेळा नेतृत्व केले. त्याने या सर्वाधिक टी 20 सामन्यात नेतृत्व करण्याच्या एमएस धोनीच्या रेकॉर्डची बरोबरी केली. त्याने 115 टी 20 सामन्यात 2,458 धावा केल्या आहेत. याचबरोबर तो 16 कसोटी सामने देखील खेळला आहे. यात त्याने दोन शतके देखील ठोकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर! किरण सरनाईक सलग दुसऱ्यांदा विजयी, काँग्रेसच्या अदिती पोहरेंचा पराभव

Spain Train Accident: स्पेनमध्ये भीषण अपघात; २ हाय-स्पीड रेल्वेगाड्यांची धडक; ३० जणांचा मृत्यू

Supreme Court Recruitment: सुप्रीम कोर्टात नोकरीची संधी! 'कोर्ट मास्टर' पदासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची दिवाळी भेट! किती टक्क्यांनी वाढला महागाई भत्ता?

Marathi News Live Updates : अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किरण सरनाईक विजयी; काँग्रेसच्या अदिती पोहरे यांचा पराभव!

SCROLL FOR NEXT