Tata Steel Chess Tournament
Tata Steel Chess Tournament 
क्रीडा

८० वी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा : आनंदची विजयी सलामी

केदार लेले

विक अॅन झी (हॉलंड)- ८० वी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा दि. १३ ते २८ जानेवारी २०१८ दरम्यान "विक अॅन झी" येथे आयोजित होत आहे. भारताचा माजी विश्वविजेता विश्‍वनाथन आनंद याने या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत मॅक्सिम मॅटलॅकॉव ला हरवून दणक्यात सुरवात केली. आनंद बरोबर, माजी विश्वविजेता क्रॅमनिक आणि अनिष गिरी यांनी सुद्धा आपले डाव जिंकत पहिल्या फेरीत विजयी सलामी दिली. 'अ' गटा मध्ये हे तीन डाव वगळता बाकीचे सर्व डाव बरोबरीत सुटले.

विदीथ गुजराथी आणि हरिका द्रोणावल्ली यांची सावध सुरुवात! 
'ब' गटा मध्ये विदीथ गुजराथी आणि हरिका द्रोणावल्ली यांनी आपापले डाव बरोबरीत सोडवले.

विश्‍वनाथन आनंद वि. मॅक्सिम मॅटलॅकॉव
आनंद आणि मॅक्सिम मॅटलॅकॉव यांच्यातील डावाची सुरवात "रॉय लोपेझ" पद्धतीने झाली. मॅटलॅकॉवने गुंतागुंतीची व्यूहरचना करण्यासाठी एका प्याद्याचा बळी दिला! ही व्यूहरचना आनंदने हेरली. मॅटलॅकॉव च्या दोन्ही अश्वांच्या बदल्यात आनंदने त्याचे उंट आणि मिळालेले प्यादे परत दिले! तसेच आनंदने त्याच्या राजाला हल्ल्यांपासून सुखरूप केले!

त्यानंतर मॅटलॅकॉव ने रचलेल्या कमकुवत आणि सदोष चालींचा आनंदाला फायदा झाला! आणखी मोहऱ्यांची अदलाबदल झाली. वजिरा-वजिरी होईल आणि पराभव अटळ आहे असे लक्षात आल्यावर मॅटलॅकॉवने पराभव मान्य केला आणि आनंदची सरशी झाली!

टाटा स्टील बुद्धिबळ - बुद्धिबळ स्पर्धेचं विम्बल्डन
८० वर्षाच्या इतिहासात या स्पर्धेचे तीनदा नाव बदलले गेले. १९३८ पासून ही पारंपारिक टुर्नामेंट हुहोवेंस नावाने खेळली जायची पण नंतर २००० मध्ये या स्पर्धेचे कोरस असे नामकरण झाले होते. २०१३ पासून ही स्पर्धा टाटा स्टील या भारतीय कंपनाच्या नावाने ओळखली जात आहे. तसेच १९३८ पासून अविरहत सुरु असल्यामुळे ह्या स्पर्धेला बुद्धिबळ स्पर्धेचं विम्बल्डन असं देखील संबोधलं जात!

पहिल्या  फेरीअखेर गुणतालिका

  1.  आनंद, क्रॅमनिक आणि अनिष गिरी - 1 गुण
  2.  कार्लसन, वेस्ली सो, कारुआना, सर्जी कॅराकिन, पीटर स्विडलर, मामेद्यारोव, अधिबन, गॅविन जोन्स  - 0.5 गुण प्रत्येकी
  3.  मॅटलॅकॉव, हू यिफान, वे यी - 0 गुण प्रत्येकी

रविवार 14 जानेवारी 2018 रोजी - अशी रंगेल दुसरी फेरी

  • आनंद वि. सर्जी कॅराकिन
  • अधिबन भास्करन वि. मॅग्नस कार्लसन
  • अनिष गिरी वि. क्रॅमनिक
  • मॅक्सिम मॅटलॅकॉव वि. वेस्ली सो
  • कारुआना वि. गॅविन जोन्स
  • हू यिफान वि. मामेद्यारोव
  • वे यी वि. पीटर स्विडलर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharjeel Imam Bail: देशद्रोही भाषण प्रकरणात शरजील इमामला जामीन

Loksabha Result: सी-व्होटरचा सर्वात मोठा अंदाज, 4 जूनपूर्वीच लावला निकाल; भाजपच्या जागा होणार कमी

T20 World Cup: है तैयार हम...! रोहित अन् हार्दिक पांड्या अ‍ॅक्शन मोडमध्ये; BCCI ने शेअर केला 'तो' 2 मिनट 12 सेंकदाचा Video

"तुमच्यामुळे शासनाची बदनामी झाली..." मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र लिहण्याऱ्या डॉ. भगवान पवार यांना नोटीस

Arvind Kejriwal's plea: अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच, 2 जूनला करावं लागणार आत्मसमर्पण

SCROLL FOR NEXT