Netherlands vs Ukraine  Twitter
क्रीडा

EURO च्या इतिहासात पहिल्यांदाच दुसऱ्या हाफमध्ये गोलची बरसात!

फुटबॉलची खरी मजा काय असते, याचा नजाराच या सामन्यात अनुभवायला मिळाला.

सुशांत जाधव

EURO 2020 Netherlands vs Ukraine : युरो कपमध्ये कमकूवत समजल्या जाणाऱ्या नेदरलँड्सने आपल्या सलामीच्या सामन्यात युक्रेनला 3-2 अशा फरकाने पराभूत केले. दोन्ही संघातील सामन्यादरम्यान एक कमालीचा रेकॉर्ड नोंदवला गेला. पहिल्या हाफमध्ये कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी मिळून 5 गोल डागले. युरोच्या इतिहासात पहिला हाफ गोलविरहित राहिल्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये गोलची बरसात झालेली ही पहिली मॅच ठरली. सर्व गोल हे दुसऱ्या हाफमध्ये झाले. फुटबॉलची खरी मजा काय असते, याचा नजाराच या सामन्यात अनुभवायला मिळाला.

नेदरलँड्सचा संघ मागील काही वर्षांपासून मोठ्या स्पर्धेत पात्र ठरलेला नाही. मागील युरो कपसह फिफा वर्ल्डकमध्येही हा संघ खेळताना दिसला नव्हता. मात्र, या संघाने यंदाच्या स्पर्धेत पात्रता सिद्ध करुन आपल्या सलामीच्या सामन्यात कमालीच्या खेळ करत बघण्यासारखा सामना खेळण्याची कुवत असल्याची झलक दाखवून दिली. नेदरलँड्सचा मिडफिल्डर जॉर्जिनियो विज्नलडम (Georginio Wijnaldum) याने संघाला खाते उघडून दिले. त्याने 52 व्या मिनिटाला पहिला गोल डागला. या गोलने आत्मविश्वास दुणावलेल्या नॅदरलँडने अधिक आक्रमक खेळाला सुरुवात केली. वॉट वुर्गर्स्ट (Wout Weghorst) याने 58 व्या मिनिटाला दुसरा गोल डागत संघाला मोठी आघाडी मिळवून दिली.

नेदरलँड्सचा संघ हा सामना 2-0 असा जिंकेल असे, युक्रेनचा खेळ पाहून वाटत होते. पण खेळातील 75 व्या मिनिटाला युक्रेनचा विंगर आंद्री यार्मोलेन्को (Andriy Yarmolenko) याने संघाचे खाते उघडले. या गोलनंतर अवघ्या चौथ्या मिनिटाला म्हणजेच खेळाच्या रमन येरेमचुक (Roman Yaremchuk) ने दुसरा गोल करत युक्रेनला बरोबरी करुन दिली. सामना बरोबरीत सुटेल, असे वाटत असताना नेदरलँड्सकडून ट्विस्ट पाहायला मिळाला. डेन्झेल डम्फ्रीझ (Denzel Dumfries) ने 85 व्या मिनिटाला गोल डागत नेदरलँड्सला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. नेदरलँड्सने ही आघाडी कामय राखत युरो कप स्पर्धेची सुरुवात विजयाने केली.

आतापर्यंत झालेले सामने आणि त्याचा निकाल

ऑस्ट्रिया आणि नॉर्थ मेसेडोनिया (3-1)

इंग्लंड विरुद्ध क्रोएशिया (1-0)

बेल्जियम विरुद्ध रशिया (3-0)

डेन्मार्क विरुद्ध फिनलंड (0-1)

वेल्स विरुद्ध स्वित्झर्लंड (1-1)

तुर्की विरुद्ध इटली (0-3)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT