ANI
ANI
क्रीडा

मैदानावर बेशुद्ध पडलेल्या एरिक्सनने रुग्णालयातून शेअर केला PHOTO

सूरज यादव

डेन्मार्क आणि फिनलँड यांच्यातील सामन्यावेली एरिक्सन मैदानावरच कोसळला होता. त्यानतंर एरिक्सनला रुग्णालयात दाखल केलं होतं.

रोम - युरो फुटबॉल स्पर्धेमध्ये डेन्मार्कचा खेळाडू ख्रिस्तियन एरिक्सन हा सामन्यावेळीच मैदानावर कोसळला होता. त्यानंतर मैदानातच त्याला सीपीआर द्यावा लागला होता. आता त्याची प्रकृती स्थिर असून, रुग्णालयातून त्याने एक पोस्ट केली आहे. आपल्या प्रकृतीची माहिती एरिक्सनने चाहत्यांना शेअर करताना आपण ठीक असल्याचं सांगितलं आहे. डेन्मार्क आणि फिनलँड यांच्यातील सामन्यावेली एरिक्सन मैदानावरच कोसळला होता. त्यानतंर एरिक्सनला रुग्णालयात दाखल केलं होतं. एरिक्सनच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे.

ख्रिस्तियन एरिक्सनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं की, सर्वांना नमस्कार, जगभरातून मिळालेल्या मेसेजेससाठी खूप आभार. माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. सध्या मी ठीक आहे. आणखी काही तपासण्या होणं बाकी आहे. मात्र मला आता बरं वाटत आहे. पुढच्या सामन्यांमध्ये मी डेन्मार्कच्या खेळाडूंना प्रोत्साहन देईन. त्यांनी डेन्मार्ककडून खेळावं आणि जिंकावं.

डेन्मार्क - फिनलँड यांच्यात सामना सुरु असताना 40 व्या मिनिटाला एरिक्सन बेशुद्ध पडला होता. तेव्हा मैदानात डॉक्टर्सनी त्याला सीपीआर दिला. तिथून एरिक्सनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्यानंतर सामना पुन्हा सुरु करण्यात आला. मात्र, मानसिक धक्का बसलेल्या डेन्मार्कच्या संघाला म्हणावा तसा खेळ करता आला नाही. त्यांना फिनलँडकडून 1-0 ने पराभव पत्करावा लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT