fifa history esakal
क्रीडा

History of FIFA: 'फुटबॉल' हे नाव एका राजाला सुचलं होतं, जाणून घ्या लाडक्या फिफाचा इतिहास

कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कपमध्ये अनेक उलटफेर पाहायला मिळत आहेत. या उलटफेरप्रमाणे खेळाचा इतिहास देखील तेवढाच रंजक आहे.

सकाळ डिजिटल टीम

History Of Football: सध्या कतारमध्ये फिफा वर्ल्ड कपचा थरार सुरू आहे. फुटबॉल जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. त्यामुळे जगातील सर्वात लोकप्रिय खेळाचा वर्ल्ड कप असल्याने चर्चा तर होणारच. फुटबॉलच्या ९० मिनिटांच्या सामान्यातील प्रत्येक सेकंद खेळाडूंसाठी महत्त्वाचा असतोच, सोबतच आपल्या आवडत्या संघाने जिंकावे यासाठी चाहते देखील देव पाण्यात घालून बसलेले असतात. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अनेक उलटफेर देखील पाहायला मिळत आहे. या उलटफेरप्रमाणेच सर्वात लोकप्रिय खेळाचा इतिहास देखील तसाच रंजक आहे.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

खूपच जुना आहे फुटबॉल खेळ

फुटबॉल या शब्दातच खेळाचा अर्थ स्पष्ट होतो. पायाने बॉलला ढकलत गोल करायचा असतो, त्यामुळे या खेळाला फुटबॉल असे नाव पडले. याच्या इतिहासाबाबत अनेक वेगवेगळी मतं देखील आहेत. फिफानुसार, फुटबॉल हा चीनी खेळ सुजूचे विकसित स्वरुप आहे. हा खेळ ह्याँ वंशाच्या काळात विकसित झाला होता. याव्यतिरिक्त जापानच्या असुका वंशांच्या शासन काळात खेळल्या जाणाऱ्या ‘केमरी’ या खेळाचे देखील हे विकसित रूप असल्याचे मानले जाते.

वर्ष १४०९ मध्ये हा खेळ ब्रिटनमध्ये देखील पोहचला. त्यावेळी राजकुमार हेनरी फोर्थने फुटबॉल असे नाव दिले. ब्रिटनमध्ये हा खेळ लोकांना एवढा आवडला की, राजा हेनरीने वर्ष १५२६ मध्ये या खेळासाठी स्पशेल बुट देखील बनवले. जेणेकरून, खेळाडूंना सहज फुटबॉल खेळता येईल. रिपोर्टनुसार, वर्ष १५८६ मध्ये जॉन डेव्हिस नावाच्या एका समुद्री जहाजाच्या कॅप्टनने ग्रीन लँड येथे आपल्या सहकाऱ्यांसोबत फुटबॉलचा सामना खेळला होता.

१६ व्या शतकात झाली स्पर्धांना सुरुवात

१६ व्या शतकाच्या अखेरीस व १७ व्या शतकाच्या सुरुवातीला फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले जाऊ लागले. यादरम्यान, दोन संघांमध्ये सामने खेळण्याची सुरुवात झाली आहे. याच काळात गोलचे देखील नियम बनवण्यात आले. त्यावेळी ८ ते १२ गोलचा एक सामना होत असे.

२०व्या शतकात फुटबॉलची लोकप्रियता शिगेला पोहचली. यावेळी फुटबॉलसाठी आंतरराष्ट्रीय संस्था असावी, असे समोर आले आहे. यासाठी इंग्लिश फुटबॉल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली फ्रान्स, डेनमार्क, स्पेन, नेदरलँड, स्वीडन, बेल्जियम आणि स्विर्झलँड सारख्या यूरोपियन देशांची बैठक देखील झाली.

पुढे जाऊन २१ मे १९०४ ला फेडरेशन इंटरनॅशनल ऑफ फुटबॉल असोसिएशन अर्थात (FIFA) ची स्थापना झाली. याचे मुख्यालय स्विर्झलँडच्या ज्यूरिख येथे आहे. याच संस्थेंतर्गत आता वर्ल्ड कपचे आयोजन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: लाखोंच्या शासकीय निधीची अफरातफर, माजी आमदारांविरोधात भाजप आक्रमक; चौकशीची मागणी

Cervical Cancer Early Detection: महिलांमध्ये गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा धोका आधीच ओळखता येणार; कामा रुग्णालयातील तज्ज्ञांच्या अभ्यासातून उघड

IPL 2026 Updates: हार्दिकनंतर Mumbai Indians एका जुन्या सहकाऱ्याला परत आणणार; रोहितच्या जागेसाठी सुरू झालाय बॅक अप प्लान

Google Gemini Bhaubeej image Prompt: गुगल जेमिनी प्रॉम्प्ट्सने बनवा भावा-बहिणीचे खास AI फोटो

Latest Marathi News Live Update : पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT