Fake IPL in Gujarat village dupes Russian punters  sakal
क्रीडा

Fake IPL: क्रिकेटर, अंपायर सगळे नकली, गुजरातमध्ये उभं राहिलंय फेक IPL

कॉमेंट्रीमध्ये हर्षा भोगलेचा नकली आवाज, वाचा फेक आयपीएलची मनाला भिडणारी कहाणी

Kiran Mahanavar

Fake IPL in Gujarat village : जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग इंडियन प्रीमियर लीगशी संबंधित अनेक वाद आणि घोटाळे आपण ऐकले आहे पाहिले पण असतील. बनावट क्रिकेट लीग, बनावट मैदान, बनावट क्रिकेटपटू पण त्यावर सट्टा लावणे खरे आहे आणि तेही परदेशातून. हे सगळं चित्रपटा सारखं वाटत आहे ना, पण हे वास्तवात घडली आहे. गुजरातमधील वडनगरमधील एका गावात अनेक दिवसांपासून आयपीएलचे बनावट क्रिकेट लीग चालवले जात होते. गुजरात पोलिसांनी बनावट आयपीएल रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. चौघांविरुद्ध फसवणूक, सट्टेबाजी व इतर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणात एका आरोपीचा शोध सुरू आहे, जो रशियात राहतो आणि तेथून सट्टेबाजीचा संपूर्ण खेळ चालवत होता.

पंधरवड्याहून अधिक काळ आयपीएलच्या रूपात यूट्यूब चॅनलवर बनावट क्रिकेट सामने थेट प्रक्षेपित केले जात होते. गावातील शेतमजूर आणि बेरोजगार तरुणांना तयार करून चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सचे टी-शर्ट घालायला दिले. वॉकी-टॉकी आणि पाच एचडी कॅमेरेही वापरले. यासोबतच मॅच ऑथेंटिक होण्यासाठी 'अॅम्बियन्स साऊंड' देखील जोडण्यात आला होता. हर्षा भोगलेची नक्कल करण्यासाठी मेरठमधील एका समालोचकाला पण आणला होता. आणि टेलिग्राम चॅनेलवर थेट सट्टेबाजी सुरू केली.

गुजरातमध्ये सुरू असलेल्या या बनावट आयपीएलचे तार रशियाशी संबंधित असून रशियातील ट्व्हर, वोरोनेज आणि मॉस्को या तीन शहरांतील लोकांना आपल्या जाळ्यात अडकवल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त केले असून आतापर्यंत घटनास्थळावरून 3 लाख रुपयांसह 4 जणांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Reservation: दिल्लीत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; महिला आरक्षण आणि फेररचना विधेयके अधिवेशनात मंजूर होणार, अमित शहांच्या भेटीनंतर मोठे विधान

Sonam Wangchuk Protest : 'मी दोन-चार दिवसांत मरणारा नाही'; सोनम वांगचुक यांचे सरकारला थेट आव्हान, २० जुलैच्या 'चलो संसद' मोर्चासाठी जनतेला आवाहन

Latest Marathi News Live Update : युनियन जिमखाना क्लबमध्ये गोळीबार; पूर्ववैमनस्यातून जालगारवर हल्ला, कॅम्प ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे

Maharashtra farmer: मोठी घोषणा! शेतकऱ्यांचे ₹48 हजार कोटींचे वीजबिल माफ; वर्षाअखेरीस 12 तास मोफत दिवसा वीज, कर्जमाफीनंतर आणखी दिलासा

Maharashtra Weather Update : मध्य महाराष्ट्र- मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT