Harmanpreet Kaur
Harmanpreet Kaur 
क्रीडा

Harmanpreet Kaur: सात नंबरचा शाप! अवघ्या काही सेंटिमिटरने होतोय स्वप्नभंग

सकाळ डिजिटल टीम

भारताचं पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच स्वप्न भंगल आहे. महिला टी २० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला केवळ ५ धावांनी हरवलं. या सामन्यात हरमनप्रीत क्रीजवर टीकली असती, तर टीम इंडियाचा विजय झाला असता. पण ती रनआऊट झाल्याने कोट्यवधी भारतीयांच मन मोडलं आणि सर्वांना महेंद्र सिंह धोनीची आठवण आली. हरमनप्रीत सोबत धोनीचा एका व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. (Fans Compare Harmanpreet Kaur Run out To MS Dhoni )

भारताने ऑस्ट्रेलियाच्या 173 धावांचे आव्हान पार करताना झुंजार वृत्ती दाखवत 167 धावांपर्यंत मजल मारली. भारताचा फक्त 5 धावांनी पराभव झाला. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने 52 धावांची झुंजार अर्धशतकी खेळी केली. मात्र 15 व्या षटकात दुसरी धाव घेताना हरमनप्रीतची बॅट अडकली अन् ती धावबाद झाली.

IND vs AUS T20 World Cup : हरमनप्रीतची बॅट अडकली अन् भारताचा विजयही; फक्त 5 धावा पडल्या कमी

नेटकऱ्यांना धोनीची आठवण

हरमनप्रीतच्या रनआऊटने प्रत्येकाला एमएस धोनीची आठवण करुन दिली. आयसीसीने हरमनप्रीत आणि एमएस धोनीच्या एकत्रित रनआऊटचा व्हिडिओ शेअर केलाय. या रनआऊटमुळे कोट्यवधींच मन मोडलं, असं कॅप्शन आयसीसीने या व्हिडिओला दिलय.

2019 च्या वनडे वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये भारताचा डाव अडचणीत सापडला होता. त्यावेळी एमएस धोनीने डाव सावरला. टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर असताना धोनी 50 धावांवर बॅटिंग करत होता. त्यावेळी डीपवरुन मार्टिन गप्टिलच्या डायरेक्ट थ्रो वर धोनी रनआऊट झाला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

नेमकं काय घडलं?

ऑस्ट्रेलियाने 173 धावांचे मोठे आव्हान ठवेल्यानंतर भारताने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र स्मृती मानधना 2 शफाली वर्मा 9 तर यस्तिका भाटिया 4 धावा करून बाद झाल्या.

मात्र त्यानंतर हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्जने फटकेबाजी करत पॉवर प्लेमध्येच 59 धावांपर्यंत मजल मारली. या दोघींनी चौथ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचत भारताला 10 व्या षटकातच नव्वदी पार करून दिली.

हरमनसोबतच जेमिमाहही आज चांगल्या स्ट्राईक रेटने धावा करत होती. तिने 24 चेंडूत 43 धावा चोपत हरमनसोबत चौथ्या विकेट्ससाठी 69 धावांची भागीदारी रचली. मात्र ब्राऊनने ही जोडी फोडली.

जेमिमाह रॉड्रिग्ज बाद झाल्यानंतर भारताची धावगती मंदावली. हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष यांनी भारताला 13 षटकात 4 बाद 111 धावांपर्यंत मजल मारली. मात्र यानंतर रिचाने आपला गिअर बदलला. या दोघांनी सामना 35 चेंडूत 45 धावा असा आणला. हरमन आपले अर्धशतक 32 चेंडूत पूर्ण केले.

मात्र भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर अर्धशतकानंतर विचित्र पद्धतीने धावबाद झाली. तिची बॅट अडकल्यामुळे ती क्रीजमध्ये वेळेत पोहचू शकली नाही. हरमन 34 चेंडूत 52 धावा करून बाद झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT