Fans Surrounded Virat Kohli Lookalike In Ayodhya Ram Mandir Pushed Him For Selfie Video Cricket News In Marathi sakal
क्रीडा

Virat Kohli : अयोध्येत विराट कोहलीला धक्काबुक्की... काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य? जाणून घ्या

Kiran Mahanavar

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने सोमवारी इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटींमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांना आमंत्रित करण्यात आले होते, परंतु ते आले नाहीत. पण अयोध्येत विराट कोहलीसारखा दिसणारा व्यक्तीला धक्काबुक्की करण्यात आली.

खरं तर विराट कोहलीसारख्या दिसणार्‍या माणसाने टीम इंडियाची जर्सी घालून आला होता. त्या व्यक्तीला रस्त्यावर लोकांनी घेरले. त्यानंतर व्यक्तीला खूप अडचणींचा सामना करावा लागला. नंतर तो व्यक्ती नाराज होऊन तेथून पळून गेला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ अयोध्येतील असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींमधून माघार घेतल्याचे बीसीसीआयने सोमवारी सांगितले. या स्टार फलंदाजाच्या बदलीची घोषणा लवकरच करणार असल्याचे बोर्डाने सांगितले.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 'विराटने वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटींमधून माघार घेण्याची विनंती बीसीसीआयला केली आहे.

बोर्डाच्या म्हणण्यानुसार, विराट कोहली कर्णधार रोहित शर्मा, संघ व्यवस्थापन आणि निवड समितीशी बोलला आहे आणि सांगितले आहे की देशाचे प्रतिनिधित्व करणे हे नेहमीच त्याचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. पण, पण, काही वैयक्तिक कारणांमुळे येता येणार नाही.

शाह म्हणाले की बीसीसीआय आपल्या स्टार खेळाडूला पूर्ण समर्थन देते आणि सर्वोत्तम फलंदाज नसतानाही संघ आणि जिंकण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवतो. उर्वरित खेळाडूंच्या क्षमतेवर बोर्डाला विश्वास आहे की ते कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करतील. सर्वांनी कोहलीच्या गोपनीयतेचा आदर करावा असे आवाहनही त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT