क्रीडा

अन् हर्षा भोगले अचानकच झाले गायब; Video पाहून नेटकरी हैराण

सकाळ डिजिटल टीम

क्रिकेट कॉमेंटेटर हर्षा भोगले यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. ते एका इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये सहभागी होऊन बोलत होते. मात्र अनपेक्षितपणे ते गायब झाले. यावेळी ते "क्या हुआ? कौन है? कहा से आ गये? असं ओरडताना ऐकू आले. हे लाईव्ह सेशन घेणारा व्यक्तीही अचंबित झाला आणि तो हर्षद सर तुम्ही बरे आहात का? असे विचारु लागला. त्यांच्या अशा गायब होण्यामुळे सोशल मीडियावर चिंतेचा सूर उमटू लागला. बघता बघता हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि हर्षा भोगलेंना नेमकं काय झालं? हा प्रश्न विचारण्यात येऊ लागला. कारण ते या सेशनच्या अँकरशी सुसंवाद साधत होते. मात्र, ते मध्येच गायब झाले आणि 'क्या हुआ, कौन है' असं म्हणताना दिसून आले.

थोड्यावेळाने त्यांनी ट्विट करुन आपल्या चाहत्यांना दिलासा दिला आहे. त्यांनी म्हटलंय की, मी ठीक आहे. तुम्हाला माझ्याबद्दल खूप चिंता वाटली म्हणून क्षमस्व. तुमच्या या प्रेमाबद्दल आणि काळजीबद्दल धन्यवाद. व्हिडीओ माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त व्हायरल झाला. तेही शिकण्यासारखे आहे. काहीतरी वेगळं घडवायचं होतं. क्षमस्व, असंही त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं?

या व्हिडीओमध्ये हर्षा भोगले अचानकच आश्चर्यचकीत झाल्यासारखे वाटले. त्यांच्या या प्रतिक्रियेवर अँकरलाही असं वाटलं की त्यांनी आपला फोन खाली टाकला आहे. हर्ष सर, मला वाटतं तुम्ही तुमचा फोन टाकला आहे, असंही तो म्हणाला. मात्र, दुसरीकडे हर्षा भोगले क्या हुआ? कौन है? कहा से आ गये? असं म्हणतच गायब झालेले दिसून आले. त्यांच्या या गायब होण्यानंतर अँकर प्रचंड भीतीने आश्चर्यचकीत झाला. हा व्हिडीओ बघता बघता व्हायरल झाला. त्यानंतर आता हर्षा भोगले यांचं स्पष्टीकरण आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

SCROLL FOR NEXT