Sourav Ganguly Jay Shah
Sourav Ganguly Jay Shah sakal
क्रीडा

Ganguly Shah Hearing : गांगुली, जय शहाचे भवितव्य आज ठरणार?, SC कडून निर्णयाची शक्यता

Kiran Mahanavar

Ganguly Shah Hearing : बीसीसीआयच्या कार्यकारिणीत सौरव गांगुली अध्यक्षपदी; तर जय शहा सचिवपदी कायम राहतील की नाही, या प्रश्‍नाचे उत्तर उद्या सर्वोच्च न्यायालयात मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. यामध्ये अंतिम निर्णय होण्याचे संकेत मिळाले आहेत.

गांगुली व शहा या दोन्ही व्यक्तींनी बीसीसीआयमध्ये वर्णी लागण्याआधी अनुक्रमे आपापल्या बंगाल व गुजरात या संघटनांमध्ये पदे भूषवली आहेत. लोढा समितीच्या घटनेनुसार सलग सहा वर्षे पद भूषवल्यानंतर तीन वर्षांचा कूलिंग ऑफ पीरीएड घ्यावा लागतो. यानुसार गांगुली व शहा यांना आपले पद सोडावे लागणार आहे.

लोढा समितीकडून तयार करण्यात आलेल्या नव्या घटनेनुसार ७० वर्षांवरील व्यक्तींना संघटनेत स्थान देता येणार नाही, पण संघटनेत अनुभवी व्यक्ती हव्या आहेत, अशी भूमिका बीसीसीआयने घेतली आहे. बीसीसीआयचा कूलिंग ऑफ पीरीयड या नियमालाही विरोध आहे. लोढा समितीच्या शिफारसीनुसार सलग सहा वर्षे राज्य किंवा बीसीसीआयच्या कार्यकारिणीत काम केल्यानंतर त्या व्यक्तीला तीन वर्षांच्या कूलिंग ऑफ पीरीयडला सामोरे जावे लागते. सर्वोच्च न्यायालय यावर कोणता निर्णय देतेय हे पाहणे रंजक ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

Weight Gain Foods : ‘या’ खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने झपाट्याने वाढू शकते वजन, खाण्यापूर्वी जरूर करा विचार

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Marathi News Live Update: पुण्यात चारचाकीच्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू

Chandu Champion Trailer: मुरलीकांत पेटकर यांची गोष्ट; प्रत्येक फ्रेममध्ये दिसते कार्तिक आर्यनची मेहनत, कसा आहे 'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर?

SCROLL FOR NEXT