क्रीडा

FIFA U-17 Women World Cup 2022 : भारतात आजपासून फुटबॉल वर्ल्डकप

१७ वर्षांखालील महिलांची स्पर्धा, अमेरिकेविरुद्ध सलामीचा सामना

सकाळ वृत्तसेवा

पणजी/ भुवनेश्वर : भारतात जागतिक फुटबॉलची पाळेमुळे रुजवण्यास मोलाची ठरू शकेल अशी फिफा १७ वर्षांखालील महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा आजपासून सुरू होत आहे. यजमान भारतासमोर बलाढ्य अमेरिकेचे आव्हान असणार आहे. भुवनेश्‍वरमधील कलिंगा स्टेडियममध्ये ही लढत होणार आहे. तर गोव्यात चिली आणि न्यूझीलंड असी पहिली लढत होणार आहे. अमेरिकेने या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याआधी कॉनकॅकॅफ हा करंडक जिंकला आहे. त्या स्पर्धेमध्ये अमेरिकन फुटबॉलपटूंनी तब्बल ५८ गोल केले. तसेच त्यांच्याविरुद्ध प्रतिस्पर्ध्यांना फक्त एक गोल करता आला आहे. त्यामुळे भारतासाठी उद्याच्या लढतीत खडतर आव्हान असेल यात शंका नाही. दरम्यान, भारतासह मोरोक्को व तांझानिया हे देशही पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत.

स्पर्धेत जर्मनीला अजून विजेतेपद मिळविता आलेले नाही, मात्र यावेळेस ‘ब’ गटात अग्रस्थान राखून विजेतेपदाचे स्वप्न साकारण्यासाठी हा संघ इच्छुक आहे. त्यांचा स्पर्धेतील पहिला सामना मंगळवारी (ता. ११) नायजेरियाविरुद्ध होईल. गोव्यातील टप्प्यातील लढती मंगळवारपासून ‘ब’ गट लढतीने सुरू होतील. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर संध्याकाळी साडेचार वाजता चिली व न्यूझीलंड यांच्यात; तर नंतर रात्री आठ वाजता जर्मनी व नायजेरिया यांच्यात लढत होईल. स्पर्धेच्या इतिहासात २००८ मध्ये तिसरा क्रमांक ही जर्मनीची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

स्पर्धेत सलग सातव्यांदा पात्र ठरणारे तीन संघ आहेत, त्यापैकी एक जर्मनी आहे. युरोपियन विजेतेपद मिळविलेला हा संघ भारतात होणाऱ्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीसाठी इच्छुक आहे. हवामानाच्या कारणास्तव भारतात खेळणे आपल्या संघासाठी आव्हानात्मक असले, तरी मैदानावर शंभर टक्के आणि सर्वोत्तम योगदान देणे हेच उद्दिष्ट असल्याचे या संघाच्या प्रशिक्षक फ्रेडरिके क्रॉम्प यांनी सांगितले. जर्मनीला आव्हान देणारा नायजेरिया संघही मातब्बर आहे. स्पर्धेसाठी ते सहाव्यांदा पात्र ठरले असून यापूर्वी तीन वेळा उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे.

न्यूझीलंडलाही चांगल्या कामगिरीची अपेक्षा

चिलीविरुद्धच्या लढतीने मोहिमेची सुरुवात करणाऱ्या न्यूझीलंडला स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. ओशेनिया गटात अव्वल ठरलेला हा संघ सलग सातव्यांदा पात्र ठरला आहे. २०१८ साली त्यांनी स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला होता. एकंदरीत किवी संघ विजेतेपदाचा दावेदार मानला जातो. आमच्या संघात गुणवान खेळाडूंचा भरणा असून सखोलता आहे. जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या स्पर्धेत आमचे खेळाडू छाप पाडतील याचा विश्वास वाटतो, असे या संघाचे प्रशिक्षक लिऑन बर्नी यांनी सांगितले. चिली संघ दुसऱ्यांदा स्पर्धेसाठी पात्र ठरला असून २०१० साली पहिल्यांदा या स्पर्धेत खेळताना ते साखळी फेरीतच गारद झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT