FIFA Womens World Cup 
क्रीडा

FIFA Womens World Cup: न्यूझीलंडमध्ये मॅच सुरू होण्यापूर्वी नॉर्वे टीमच्या हॉटेलजवळ गोळीबार, दोन ठार

Kiran Mahanavar

FIFA Womens World Cup : महिला फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये केले जात आहे. न्यूझीलंड आणि नॉर्वे यांच्यातील सलामीच्या सामन्यापूर्वी एका घटनेने संपूर्ण जगाला धक्का बसला.

नॉर्वे टीमच्या हॉटेलजवळ गोळीबार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. उद्घाटन सामन्याच्या काही तासांपूर्वी ही घटना घडली. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. वृत्तानुसार गोळीबारात सहा जण जखमीही झाले आहेत. यामध्ये पोलिसांचाही समावेश आहे.

मात्र, या घटनेचा सामन्यावर परिणाम झाला नाही. उद्घाटनाचा सामना निर्धारित वेळेत सुरू झाला. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस हिपकिंस यांनी या घटनेची माहिती सर्वांना दिली. ते म्हणाले की, हा दहशतवादी हल्ला नाही. राष्ट्रीय सुरक्षेला कोणत्याही धोक्याशी संबंधित बाब नाही. स्पर्धा त्याच्या वेळेवर सुरू होईल. नॉर्वे खेळाडूंच्या हॉटेलजवळ गोळीबार झाल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे. खेळाडूंनी सोशल मीडियावर आपल्या प्रकृतीची माहिती दिली.

शूटिंगनंतर शहरातील एका फॅनचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. एवढेच नाही तर इटालियन संघाचे सराव सत्रही उशिरा सुरू झाले. गोळीबारानंतर खेळाडूंना हॉटेलमधून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचवेळी अमेरिकन दूतावासाने आपल्या खेळाडूंच्या सुरक्षेबाबत माहिती दिली. उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस ऑकलंडमध्ये आहेत. ती तिचा पती डग्लस एमहॉफसोबत सुरक्षित आहे.

यावेळी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील नऊ शहरांमध्ये 10 मैदानांवर सामने खेळवले जाणार आहेत. महिनाभर चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 64 सामने खेळवले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, LSG vs GT: जॉस बटलर - शुभमन गिल बरसले, गुजरातचा सलग दुसरा विजय; रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का

Coal Rate: आता वीज बिल वाढणार नाही! कोल इंडियाचा मोठा निर्णय; उद्योग आणि ग्राहकांना मोठा दिलासा

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Breaking News Live Update: संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील एलओपी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

SCROLL FOR NEXT