Croatia-Belgium and Morocco-Canada in Group F 
क्रीडा

FIFA WC22 : 'फ' गटात युरोपातील बलाढ्य संघ अडचणीत! मोरोक्कोला बाद फेरी गाठण्याची सुवर्णसंधी

'फ' गटातील बाद फेरीचे समीकरण

Kiran Mahanavar

FIFA World Cup 2022 Group F : मोरोक्को या आफ्रिका ३० खंडातील देशाकडे फिफा फुटबॉल विश्वकरंडकाच्या बाद फेरीत पोहोचण्याची सुवर्णसंधी असणार आहे. मोरोक्कोने 'फ' गटातील अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत कॅनडाला पराभूत केल्यास मोरोक्कोचा संघ सात गुणांसह बाद फेरीतील पोहोचणार हे पक्के आहे. अशावेळी त्यांना बेल्जियम व क्रोएशिया यांच्यामधील लढतीच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार नाही. बेल्जियम व क्रोएशिया या युरोप खंडातील बलाढ्य देशांपैकी एक देश स्पर्धेबाहेर होऊ शकतो.(Croatia-Belgium and Morocco-Canada in Group F)

बेल्जियम-क्रोएशिया यांच्यामधील लढतीतील विजेता पुढे जाईल, मात्र पराभूत संघाला बाहेरचा रस्ता पकडावा लागू शकतो. त्यामुळे या लढतीवर तमाम फुटबॉलप्रेमींच्या नजरा खिळल्या आहेत. एकदाही बाद फेरीत पोहोचला नाही. मोरोक्कोसाठी उद्याची लढत अत्यंत महत्त्वाची असणार आहे. विजय किंवा ड्रॉ (बरोबरी) ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. असे झाल्यास मोरोक्कोचा संघ तब्बल ३६ वर्षांनंतर अंतिम १६ फेरीमध्ये पोहोचणार आहे.

मोरोक्कोने सलामीच्या लढतीत क्रोएशियाला गोलशून्य बरोबरीत रोखले. तसेच त्यानंतर जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या बेल्जियमला २-० अशी धूळ चारली. त्यामुळे मोरोक्कोला अंतिम १६ मध्ये प्रवेश करण्याची संधी निर्माण झाली आहे.

दुसऱ्या स्थानावरील संघाला हवाय विजय

फिफा क्रमवारीत बेल्जियम हा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र गुणतक्क्यात बेल्जियमचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. कॅनडा स्पर्धेबाहेर गेला आहे. बेल्जियमचे ३ गुण झाले असून त्यांनी क्रोएशियाला पराभूत केल्यास त्यांचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित होईल. पण क्रोएशियाकडून त्यांना हार सहन करावी लागल्यास बेल्जियमचा संघ बाद होईल, क्रोएशियाला बेल्जियमविरुद्धच्या लढतीत बरोबरी झाल्यानंतरही चालणार आहे.

'फ' गटातील बाद फेरीचे समीकरण

  • मोरोक्कोने कॅनडाला पराभूत केल्यास त्यांचा प्रवेश पक्का

  • क्रोएशिया बेल्जियम यांच्यातील विजेताही पुढे जाणार

  • कॅनडाने मोरोक्कोला नमवल्यास मोरोक्कोचा प्रवेश क्रोएशिया- बेल्जियम लढतीच्या निकालावर अवलंबून असेल

  • विजयासह मोरोक्को व क्रोएशिया बेल्जियम यांच्यातील विजेता आगेकूच करील

"फ गटातील - आजच्या लढती

  • क्रोएशिया-बेल्जियम - अल रयान - रात्री ८.३० वाजता

  • मोरोक्को - कॅनडा दोहा - रात्री ८.३० वाजता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Pune Metro Route : विमानतळ-कल्याणीनगर मेट्रोमार्ग निश्‍चित; सुरळीत वाहतुकीसाठी पौडफाटा ते वनदेवी होणार दुहेरी उड्डाणपूल

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

SCROLL FOR NEXT