FIFA World Cup 2022 Group F Morocco Croatia
FIFA World Cup 2022 Group F Morocco Croatia esakal
क्रीडा

FIFA World Cup 2022 : तब्बल 36 वर्षानंतर मोरोक्को बाद फेरीत; एकही गोल न करता क्रोएशियाने बेल्जियमचा केला गेम

अनिरुद्ध संकपाळ

FIFA World Cup 2022 Group F Morocco Croatia : फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये आज ग्रुप F चे दोन सामने झाले. यात मोरोक्कोने कॅनडाचा 2 - 1 असा पराभव करत 1986 नंतर पहिल्यांदाच वर्ल्डकपची बाद फेरी गाठली. दुसरीकडे गतवेळच्या उपविजेत्या क्रोएशियाने बेल्जियमला 0 - 0 असे बरोबरीत रोखत आपले राऊंड 16 चे स्थान पक्के केले. बेल्जियमला 1998 नंतर पहिल्यांदा बाद फेरी गाठण्यात अपयश आले. तर क्रोएशिया 2018 आणि 2022 असा सलग दोन वर्ल्डकमध्ये बाद फेरीत पोहचली आहे. यापूर्वी त्यांना 2002, 2006, 2014 ला बाद फेरी गाठण्यात अपयश आले होते. ग्रुप F मध्ये मोरोक्कोने 7 गुण घेत अव्वल स्थान पटकावले. तर क्रोएशिया 5 गुण घेत दुसऱ्या स्थानावरून बाद फेरीसाठी पात्र ठरली.

कॅनडा आणि मोरोक्को सामन्यात मोरोक्कोच्या हकीम झियेचने सामन्याच्या चौथ्या मिनिटालाच कॅनडाच्या गोंधळलेल्या बचावाचा फायदा घेत गोल डागला. सामन्याच्या सुरूवातीलाच कॅनडाने गोल खाल्याने ते बॅकफूटला गेला. कॅनडाच्या कमकूवत बचावाचा मोरक्कोने पुन्हा एकदा फायदा उचलला. त्यांच्या युसेफ एम - नेसयरीने हकिमीच्या सहाय्याने कॅनडावर दुसरा गोल केला. मात्र हाफ टाईम संपत आला असताना मोरोक्कोचा बचावपटू नायेफने मोठी चूक केली. त्याने 40 व्या मिनिटाला स्वयम गोल करत कॅनडाला आयती संधी दिली. मात्र तरी देखील दुसऱ्या हाफमध्ये कॅनडाला मोरोक्कोचा बचावा भेदता आला नाही. अखेर मोरोक्कोने सामना 2 - 1 असा जिंकत 1986 नंतर पहिल्यांदाच वर्ल्डकपची बाद फेरी गाठली.

ग्रुप F मधील दुसऱ्या सामन्यात गतवेळच्या उपविजेत्या क्रोएशियाने बेल्जियमचे आक्रमण 90 मिनिटे रोखून धरण्यात यश मिळवले. या सामन्यात दोन्ही संघांना एकही गोल केला नाही. बाद फेरी गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या बेल्जियमने क्रोएशियाच्या गोलपोस्टवर 16 वेळा चढाई केली. त्यातील 3 वेळा त्यांचा शॉट अचूक होता. मात्र क्रोएशियाने आपल्या गोलपोस्टचा चांगला बचाव केला. दरम्यान, क्रोएशियाने देखील बेल्जियमच्या गोलपोस्टवर 11 वेळा चढाई करत गोल नोंदवण्याचा प्रयत्न केला. 4 वेळा त्यांचा शॉटने बेल्जियमचा गोलपोस्ट भेदण्याचा अचूक प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न बेल्जियमने हाणून पाडला. सामन्यात पासेस, बॉल पजेशनच्या बाबतीत दोन्ही संघांनी तुल्यबळ खेळ केला.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT