Morocco Football Team Prize Money
Morocco Football Team Prize Money esakal
क्रीडा

Morocco FIFA World Cup : मोरोक्कोनं मन जिंकलं! खेळाडूंनी 180 कोटी रूपयांची बक्षीस रक्कम केली गरिबांना दान

अनिरुद्ध संकपाळ

Morocco Football Team Prize Money : कतारमध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये मोरोक्कोने सेमी फायनल गाठत इतिहास रचला होता. ती फुटबॉल वर्ल्डकप इतिहासातील सेमी फायनलला पोहचणारी पहिला आफ्रिकन संघ ठरला होता. मात्र सेमी फायनलमध्ये मोरोक्कोचा पराभव झाला. तिसऱ्या क्रमांकासाठी क्रोएशियाविरूद्ध देखील मोरोक्कोच्या पदरी पराभव पडला. फिफा वर्ल्डकपमध्ये चौथ्या स्थानावर राहिलेल्या मोरोक्कोला बक्षीस म्हणून 22 मिलियन डॉलर (जवळपास 181 कोटी रूपये) मिळाले होते. ही रक्कम त्यांनी गरीबांना दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोरोक्कोने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये स्पेन आणि पोर्तुगाल सारख्या तगड्या संघांना मात देत सेमी फायनल गाठली होती. त्यांचा सेमी फायनलमध्ये मुकाबला हा गतविजेत्या फ्रान्ससोबत होता. मात्र कसलेल्या फ्रान्स संघाने मोरोक्कोला 2 - 0 अशी मात दिली. त्यामुळे मोरोक्कोचे फिफा वर्ल्डकप खेळणारा पहिला आफ्रिकन देश होण्याचे स्वप्न भंगले.

सेमी फायनल हरल्यानंतर त्यांचा तिसऱ्या स्थानासाठी सामना गतवेळचे उपविजेते क्रोएशिया यांच्याशी होता. हा देखील सामना क्रोएशियासाठी सोपा नव्हता. क्रोएशियाने त्यांचा 2 - 1 असा पराभव केला. जरी मोरोक्कोला तिसऱ्या स्थानाचा सामना जिंकता आला नसला तरी त्यांनी सेमी फायनल गाठून आधीच इतिहास रचला होता. त्यामुळे फुटबॉल चाहत्यांची त्यांनी आधीच मने जिंकली होती.

मात्र मोरोक्कोने चौथ्या स्थानावर राहून देखील अशी काही कृती केली की सर्व फुटबॉलप्रेमींच्या मनात त्यांच्याप्रती आदर द्विगुणित झाला. मोरोक्कोला बक्षीस म्हणून 22 मिलियन डॉलर मिळाले होते. ही रक्कम त्यांनी गरीबांना दान करण्याचा निर्णय घेतला. मोरोक्कोचे खेळाडू ही सर्व रक्कम आपापसात वाटून घेऊन गब्बर झाले असते. मात्र दर्जेदार फुटबॉलने वर्ल्डकपमध्ये चाहत्यांची मने जिंकणाऱ्या मोरोक्कोने ही रक्कम गरीब लोकांच्या मुलांना दान करण्याचा निर्णय घेतला.

स्पोर्ट्स पेआऊट्सच्या रिपोर्टनुसार मोरोक्कोने फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये 2.5 मिलियन डॉलर पुरस्कार रक्कम जिंकली. त्याचबरोबर त्यांना चौथ्या स्थानावर राहिल्यामुळे 22 मिलियन डॉल रक्कम देखील देण्यात आली. ही रक्कम संघाने गरीब मुलांना दान केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT