FIFA World Cup 2022 Neymar to miss Brazil next two group games due to ankle injury  esakal
क्रीडा

Neymar Injury Update : ब्राझीलला धक्का! नेमारच्या दुखापती वर आली मोठी अपडेट

सकाळ डिजिटल टीम

FIFA World Cup 2022: ब्राझीलच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत निराशाजनक बातमी समोर येत आहे. संघाचा स्टार फुटबॉलपटू नेमार घोट्याच्या दुखापतीमुळे ब्राझीलच्या पुढील दोन ग्रुप सामन्यांना मुकणार आहे. या बातमीमुळे ब्राझीलच्या जगभरातील चाहत्यांना धक्का बसला असून प्रत्येकजण नेमारचे फिटनेस अपडेट काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

फिफा वर्ल्डकप 2022 मधील संभाव्य विजेत्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझीललने आपली वर्ल्डकप मोहिम विजयाने सुरू केली होती. ग्रुप G च्या सामन्यात सर्बियाचा 2 - 0 असा पराभव केला. मात्र या सामन्यादम्यान, ब्राझीलचा कर्णधार नेमारला जबर दुखापत झाली आहे. त्याला पुढचे 48 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. आता तो पुढील दोन सामन्यांना मुकणार आहे.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

संघाच्या डॉक्टरांनी त्याच्या दुखापतीबाबत बोलताना सांगितले. नेमारने प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूसोबत टक्कर झाल्यानंतर 79 व्या मिनिटाला मैदान सोडले होते. त्याचा घोटा मुरगळला होता. नेमारची दुखापत पाहता तो फिफा वर्ल्डकपला मुकणार की काय अशी भिती निर्माण झाली आहे.

नेमार सध्या दिग्गज पेले यांच्या ब्राझीलसाठी 77 गोल केलेल्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून दोन गोल मागे आहे. मात्र दुखापतींनी कायम ग्रासलेला नेमार मोठ्या स्पर्धेत हमाखास दुखापतग्रस्त होतो असा इतिहास आहे. नेमार 2014 मध्ये पहिल्यांदा फिफा वर्ल्डकप खेळला. त्यावेळी त्याला कोलंबियाविरूद्धच्या क्वार्टर फायनल सामन्यात पाठीला दुखापत झाली. नेमार नसल्यामुळे सेमीफायनल सामन्यात ब्राझीलला जर्मनीकडून 7 - 1 असा अपमानजनक पराभव सहन करावा लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT