FIFA World Cup 2022 esakal
क्रीडा

FIFA World Cup 2022 : संभाव्य विजेते ब्राझीलची मोरोक्कोवर १-० मात

'अ' गटात अमेरिका, भारत, मोरोक्को आणि ब्राझील हे चार संघ

सकाळ वृत्तसेवा

भुवनेश्वर : भारतात सुरु असलेल्या १७ वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल विश्वकरंडकाच्या अ गटाच्या आज झालेल्या सामन्यात संभाव्य विजेते ब्राझीलने मोरोक्कोवर १-० अशी मात केली. मोरोक्कोची ही पहिलीच १७ वर्षांखालील मुलींची फूटबॉल विश्वकरंडक स्पर्धा असून ; त्यांनी बलाढ्य ब्राझीलला चांगलीच चिवट लढत दिली. इन्ग्रिड मोराईसने सामन्याच्या पाचव्या मिनिटाला गोल करत ब्राझीलला महत्वाची आघाडी मिळवून दिली.

ब्राझिलकडे सामन्याच्या ६५ टक्के वेळ बॉलचा ताबा होता. ब्राझीलच्या संघाने तब्बल १७ वेळा गोलपोस्टच्या दिशेने बॉल मारला. तर मोरोक्कोला फक्त चार वेळाच गोलपोस्टच्या दिशेने बॉल मारता आला. मोरोक्कोवरच्या विजयाने ब्राझीलने महत्वाचे तीन गुण मिळवले असून अ गटात अमेरिका, भारत, मोरोक्को आणि ब्राझील हे चार संघ आहेत. त्यामुळे या गटात चुरस पाहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minor Girl Acid Attack: शाळेतून घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड हल्ला; अहिल्यानगर हादरलं, नराधम फरार

Laxman Hake : सुनेत्रावहिनींना विधानपरिषदेवर बिनविरोध पाठवा; बारामतीची निवडणूक आम्ही ठामपणे लढविणार...

Pune Traffic: महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे उद्यापासून पुण्याच्या वाहतुकीत बदल; लोणीकंद-खराडी मार्गावर अवजड वाहनांना बंदी

हा राया नाहीतर भलताच ! मालिकेतून 4 कलाकार बाहेर पडल्यानंतर आलेल्या नव्या ट्विस्टने प्रेक्षक चक्रावले

दोन बहिणी, दोन मालिका, झी मराठीच्या 'या' नायिका आहेत सख्ख्या बहिणी; गाजवतायत टीव्ही इंडस्ट्री, तुम्ही ओळखल्या का?

SCROLL FOR NEXT