FIFA World Cup 2022 Al Rihla Ball
FIFA World Cup 2022 Al Rihla Ball  esakal
क्रीडा

FIFA World Cup 2022 : कतारमधील वर्ल्डकपसाठी Adidas ने तयार केलेला 'अल रिहला' बॉल आहे खूप खास

अनिरुद्ध संकपाळ

FIFA World Cup 2022 Al Rihla Ball : फिफा आपल्या प्रत्येक वर्ल्डकपसाठी एक खास बॉल तायर करते. प्रत्येक वर्ल्डकपमध्ये वापरण्यात येणाऱ्या बॉलची काही वैशिष्टे असतात. 1970 पासून Adidas ही एकच कंपनी फिफाच्या प्रत्येक वर्ल्डकपसाठी बॉल तयार करत आहे. Adidas प्रत्येक वर्ल्डकपमध्ये एक थीम घेऊन हे बॉल तयार करत असते. त्याप्रमाणे त्याला रंग आणि डिझाईन तायर केले जाते. यंदाच्या कतारमधील वर्ल्डकपची थीम आहे 'अल रिहला'.

फिफाने दावा केला आहे की, 'अल रिहला या कतार फुटबॉल वर्ल्डकपमध्ये वापरण्यात येणारा बॉल हा आतापर्यंतच्या स्पर्धेतील सर्वात जास्त वेगाने किक करता येणारा बॉल आहे. Adidas ने फिफासाठी सलग 14 वा चेंडू डिझाईन केला आहे. त्यांनी एक थीमनुसार हा बॉल तयार केला आहे.'

अरबी भाषेत अल रिहलाचा अर्थ हा प्रवास असा होता. हे नाव 14 व्या शतकातील संशोधक आणि प्रवासी इब्न बतुता यांनी लिहिलेल्या प्रवासवर्णनावरून घेतले आहे. फिफाने पर्यावरण आणि शाश्वत विकासाला खूप महत्व दिले आहे. त्यामुळे पहिल्यांदाच फिफा वर्ल्डकपमध्ये फक्त पाणी वापरून तयार केली शाई आणि डिंकाने बॉल डिझाईन केला आहे. या बॉलवरील भडक आणि व्हायब्रंट रंग हे कतारची संस्कृती, आर्किटेक्चर आणि ध्वज यापासून प्रेरित आहेत.

हेही वाचा : Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या रोड शो साठी महायुतीच्या नेत्यांची पुण्यात बैठक

SCROLL FOR NEXT