FIFA World Cup 2022 Son Heung min mask
FIFA World Cup 2022 Son Heung min mask esakal
क्रीडा

FIFA World Cup 2022 : दक्षिण कोरियाचा स्टार स्ट्रायकर का घालणार आहे 'काळा मास्क'

अनिरुद्ध संकपाळ

FIFA World Cup 2022 : फिफा वर्ल्डकपमध्ये दक्षिण कोरिया गुरूवारी उरूग्वेविरूद्धच्या सामन्यातून आपली वर्ल्डकप मोहिम सूरू करणार आहे. या सामन्याकडे दोन्ही देशातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष असणार आहे. याचबरोबर या सामन्यात दक्षिण कोरियाचा स्ट्रायकर सोन ह्यू मिन याच्याकडे देखील चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे. कारण तो या सामन्यात आपल्या चेहऱ्यावर एक खास मास्क घालणार आहे.

कोरियाचा हा स्ट्रायकर सोन आतापर्यंत 104 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला आहे. यात त्याने 35 गोल केले आहेत. मात्र तो 2 नोव्हेंबरपासून फुटबॉलच्या मैदानावर उतरलेला नाही. चॅम्पियन्स लीगच्या सामन्यादरम्यान त्याची आणि मार्सेलीच्या चानसेल मबेंबाची टक्कर झाली होती. त्यामुळे त्याच्या डाव्या डोळ्याला फ्रॅक्चर झाले होते.

गेल्या हंगामात प्रीमियर लीगमध्ये सोन सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये सामील होता. आता जो उरूग्वेविरूद्धच्या सामन्यात चेहऱ्यावर सुरक्षा मास्क घालून उतरणार आहे. मात्र या मास्कमुळे त्याच्या चेहऱ्याची किती सुरक्षा होईल याबाबत सोनला साशंकता आहे. सोनने कतारमध्या आल्यापासून मास्क घालूनच सराव सत्रात सहभाग नोंदवला आहे.

दक्षिण कोरियाची सर्व मदार ही स्ट्रायकर सोनवरच असणार आहे. तो दोन्ही पायांनी चांगल्याप्रमकारे शॉट्स मारू शकतो. उरूग्वेचा स्ट्रायकर लुऊ सुआरेज आणि त्याचा साथीदार एडिनसन कवानी यांचा हा चौथा वर्ल्डकप आहे. सुआरेजने आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये 7 गोल केले आहेत. तो सध्या ऑस्कर मिगुएज यांच्या राष्ट्रीय विक्रमापासून एक गोल दूर आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT