Kolhapur Football News esakal
क्रीडा

Kolhapur Football : फुटबॉलच्या पंढरीत जोरदार राडा; मैदानातच खेळाडूंमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी

हा राडा रोखताना पंचांची चांगलीच तारांबळ उडाली. स्टेडियमवरील वातावरण तणावपूर्ण झालं.

सकाळ डिजिटल टीम

मैदानावर खेळाडूंमध्ये राडा सुरू असतानाच प्रशिक्षक बसलेल्या ठिकाणीच राखीव खेळाडूंमध्येही हाणामारी सुरू झाली. सुमारे 10 ते 15 मिनिटं गदारोळ सुरू होता.

Kolhapur Football News : कोल्हापूरला फुटबॉलची पंढरी म्हणून ओळखलं जातं. भारतीय क्रिकेट संघानं मोठी मालिका जिंकल्यानंतर किंवा पाकिस्तानला नमवल्यानंतर जसा शिवाजी चौकात कोल्हापुरकरांचा हक्काचा जल्लोष असतोच, पण त्याच्या कैकपटीनं अधिक रोमांच, ईर्ष्या, संघर्ष गल्लोगल्लीमध्ये फुटबाॅलसाठी दिसतो.

सध्या शाहू स्टेडियमवर (Shahu Stadium) सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत (Satej Cup Football Tournament) सामन्यावेळी बीजीएम स्पोर्टस् (BGM Sports) आणि झुंजार फुटबॉल क्लबच्या (Zunjar Football Club) खेळाडूंमध्ये किरकोळ कारणावरून मैदानावरच वादावादी झाली. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. एकमेकांवर धावून जात जोरदार हाणमारी केली.

स्टेडियमवर तणावपूर्ण वातावरण

हा राडा रोखताना पंचांची चांगलीच तारांबळ उडाली. स्टेडियमवरील वातावरण तणावपूर्ण झालं. दरम्यान, पंचांनी दोन्ही संघांच्या प्रत्येकी दोन अशा चार खेळाडूंना रेडकार्ड दाखवत मैदानाबाहेर काढलं. सामना संपण्यासाठी काही मिनिटांचा वेळ बाकी असतानाच, अचानक दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. खेळाडू अर्वाच्य शिवीगाळ करत एकमेकांच्या अंगावर धावून जाऊ लागले. बघता-बघता जोरदार हाणामारी सुरू झाली, त्यामुळं तणाव निर्माण झाला.

दोन्ही संघाच्या खेळाडूंना 'रेडकार्ड'

मैदानावर खेळाडूंमध्ये राडा सुरू असतानाच प्रशिक्षक बसलेल्या ठिकाणीच राखीव खेळाडूंमध्येही हाणामारी सुरू झाली. सुमारे 10 ते 15 मिनिटं गदारोळ सुरू होता. संयोजन समिती व केएसएकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यालाही दोन्ही संघाचे खेळाडू जुमानत नव्हते. अखेर दोन्हीकडच्या वरिष्ठांनी याची दखल घेत वाद मिटवला. दरम्यान, सामना सुरू असताना गैरवर्तन केल्याबद्दल दोन्ही संघाच्या चौघांना रेडकार्ड देण्यात आलं. यामध्ये झुंजार क्लबच्या सूर्यदीप सासणे, अवधुत पाटोळे तर बीजीएम स्पोर्टसच्या अभिजीत साळोखे, महेश जामदार या खेळाडूंचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT