india and west indies t20 sakal
क्रीडा

IND vs WI: रोहित अँड टीमला मिळाला व्हिसा, शेवटचे 2 सामने अमेरिकेतच

रोहित शर्मा, राहुल द्रविड, संजू सॅमसन आणि इतर 11 जणांकडे अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसा नव्हता, मात्र...

Kiran Mahanavar

India and West Indies : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचे दोन T20 आंतरराष्ट्रीय सामने अमेरिकेत होणार असल्याचे अखेर स्पष्ट झाले. खेळाडूंना अमेरिकेचा व्हिसा न मिळाल्याने आगामी दोन सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, परंतु आता भारत आणि वेस्ट इंडिज संघाच्या सर्व सदस्यांना अमेरिकेला जाण्यासाठी अधिकृतपणे मंजुरी देण्यात आल्याची बातमी आली आहे.

रोहित शर्मा आणि कंपनीला फ्लोरिडा सामन्यांसाठी व्हिसा मिळाला आहे. रविचंद्रन अश्विन फ्लोरिडाला पोहोचला आहे. रोहित शर्मा, राहुल द्रविड, संजू सॅमसन आणि इतर 11 जणांकडे अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसा नव्हता, मात्र आता संपूर्ण टीमला व्हिसाची मंजुरी मिळाली आहे. म्हणजेच टी-20 मालिकेतील चौथा आणि पाचवा सामना फ्लोरिडामध्येच खेळवला जाईल. वेस्ट इंडिजचा संघ आधीच अमेरिकेत पोहोचला आहे.

क्रिकबझच्या अहवालानुसार ज्या खेळाडूंकडे व्हिसा नव्हता. त्याला गयाना येथील अमेरिकन मुलाखतीसाठी पाठवण्यात आले होते. तिसर्‍या T20 सामन्यानंतर ही मुलाखत झाली. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा समावेश आहे. रवींद्र जडेजा, आर अश्विन, दिनेश कार्तिक, रवी बिश्नोई, सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव आधीच अमेरिकेला पोहोचले आहेत. भारतीय संघ या मालिकेत 2-1 ने पुढे आहे. अशा परिस्थितीत चौथा टी-20 सामना जिंकून टीम इंडियाच्या नजरा सीरिज जिंकण्यावर असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance Share: अंबानींच्या Reliance ला मोठा धक्का! शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले; नेमकं काय घडलं?

Jalna News : महापालिकेत भाजप-शिवसेनेचा राडा; महात्मा फुले मार्केट वरून जुंपली

Latest Marathi News Live Update : कल्याण ते टिटवाळा रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड

IPL 2026 : ओहहहह भाई.. मोहम्मद शमीचा 'मॅजिक' डान्स पाहिलात का? SRH वर दणदणीत विजयानंतर भन्नाट सेलिब्रेशन Video Viral

पारूमधील 'ही' गाजलेली जोडी आता गाजवणार रंगभूमी ! स्पायगिरी नाटकात साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

SCROLL FOR NEXT