pele death news esakal
क्रीडा

Pele Passes Away: फुटबॉलचा देव गेला ! ब्राझीलचे महान फुटबॉलर पेले यांचे निधन !

Bhushan Tare भूषण टारे

फुटबॉलमधील सर्वकालीन महान प्लेयर पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. ब्राझीलला तीन वेळा वर्ल्डकप मिळवून देणारे महान फुटबॉलपटू पेले हे गेले काही दिवस साओ पाउलोच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते.

(Football legend Pele dies at 82 one of the greatest of all time passes away)

ब्राझीलचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू. संपूर्ण नाव एड्‌सन आरेंटीस डू नाशसिमेंटू. ब्राझीलमधील ट्रेस कुरसँइस येथील एका गरीब कुटुंबात जन्म. लहानपणापासूनच त्याला फुटबॉलची आवड होती. 

पेलेची एकूण गोलसंख्या १,३६३ सामान्यांत १,२८१ झालेली . १ ऑक्टोबर १९७७ रोजी, वयाच्या ३७ व्या वर्षी पेले फुटबॉल खेळातून निवृत्त झाला. त्याच्या काळातील तो आतील आघाडीवर (इनसाइड फॉरवर्ड  खेळणारा सर्वोत्कृष्ट खेळाडू मानला जायचा. अप्रतिम कौशल्य, कमालीचे चापल्य, आक्रमकता, अचूक अंदाज आणि शारीरिक सुदृढता यांच्या बळावर पेलेची कारकीर्द यशस्वी ठरली. गोल करण्याची त्याची क्षमता अद्वितीय होती

जगभरचे चहाते त्याला ‘किंग’ पेले किंवा ‘ब्‍लॅक पर्ल’ म्हणून ओळखू लागले. १९६० ते १९७० या दशकातील तो सर्वांत श्रेष्ठ खेळाडू समजला जातो. अमेरिकेत त्याने फुटबॉलचा खेळ लोकप्रिय केला व त्या खेळाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. तो एकदा भारतातही येऊन गेला. 

पेले यांना कोलोरेक्टर कन्सर झाला होता. प्रकृती खालवल्यामुळे त्यांना साओ पाउलो येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पेले यांनी यंदाचा नाताळ सण देखील रुग्णालयातच साजरा केला होता. मात्र तेथे यांची प्रकृती सातत्याने खालावत चालली व त्यांच्या किडनी आणि हृदयावर परिणाम होत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates: पुढच्या वर्षी लवकर या! पुणे, मुंबईसह आज राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची धूम

Ganesh Visarjan 2025: गणेश विसर्जनाच्या दिवशी नैवेद्यात बनवा 'हे' चविष्ट हलवा, बाप्पा प्रसन्न होतील

Vijay Wadettiwar: सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक: काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार; 'ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष उभा केल्याचा आरोप'

Latest Maharashtra News Updates : अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण तूर्त स्थगित, मंत्री अतुल सावे यांच्या आश्वासनानंतर निर्णय

Ganesh Visarjan 2025: गणपती उत्सवात नाचून पाय थकले? 'या' उपायांनी मिळवा पाय दुखण्यापासून मुक्ती

SCROLL FOR NEXT