Football legend Pele Passes Away  sakal
क्रीडा

Pele Passes Away: कलकत्याच्या रस्त्यांनी एवढी गर्दी कधीच पाहिली नव्हती, पेले भारतात आला होता तेव्हा...

फुटबॉलचा देव गेला! ब्राझीलचे महान फुटबॉलर पेले यांचे निधन

Kiran Mahanavar

Football legend Pele Passes Away : जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेले ब्राझीलचे महान खेळाडू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला त्यांच्या मुलीने दुजोरा दिला. फुटबॉलचा देव म्हटल्या जाणाऱ्या पेले यांच्याही भारताशी संबंधित काही आठवणी आहेत. 25 सप्टेंबर 1977 हा दिवस होता प्रसिद्ध पेले भारतीय संघ मोहन बागानसोबत मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी आले होते. त्याच्या चाहत्यांनी कोलकाताचे रस्ते अडवले. त्यावेळी दूरदर्शन, वर्तमानपत्रे, मासिके त्यांच्या बातम्यांनी भरलेली होती.

ब्राझीलला तीन विश्वचषक जिंकून देणारे फुटबॉलपटू पेले निवृत्तीपूर्वी भारताला भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळस लोकांची खुप गर्दी झाली होती. त्यानंतर त्यांचा सामना पीके बॅनर्जी आणि कर्णधार सुब्रतो भट्टाचार्य यांच्यासमवेत तत्कालीन प्रसिद्ध फुटबॉल संघ मोहन बागान संघाशी झाला. ऐतिहासिक त्या मैत्रीपूर्ण सामन्यात मोहन बागानने पेलेच्या कॉसमॉस क्लबच्या विजय रथला 2-2 अशा बरोबरीत रोखले.

25 सप्टेंबर 1977 रोजी पेले मैदानात असताना त्यांचे चाहते स्टेडियमच्या आत पेले-पेले असा जयघोष करत होते. मैदानाबाहेरही लोकांची गर्दी होती. फुटबॉल इतिहासकार नोवी कपाडिया यांनी त्यांच्या 'बेअरफूट टू बूट्स' या पुस्तकातील काही क्षण आठवले. दिग्गज ब्राझीलचा फुटबॉलपटू पेले विमानतळाबाहेर पडताच त्यांचे स्वागत करण्यासाठी लाखो लोक जमले होते, असे त्यांनी पुस्तकात नमूद केले आहे. त्यांनी पुस्तकात पुढे नमूद केले आहे की कोलकाता येथील त्यांच्या हॉटेलबाहेर प्रचंड गर्दी होती. लोक पेलेची एक झलक पाहण्यासाठी थांबले होते. लोक ज्या माणसाला त्यांनी बहुतेक टेलिव्हिजनवर पाहिले होते त्याची झलक पाहण्यासाठी लोक आतुर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT