Messi By Neck For Selfie
Messi By Neck For Selfie  Sakal
क्रीडा

मेस्सीचा गळा आवळत काढला सेल्फी; व्हिडिओ शेअर करत म्हणाला...

सकाळ डिजिटल टीम

फुटबॉल सामन्यावेळी मैदानात प्रेक्षक घुसण्याच्या घटना आता सामान्य झाल्याचे चित्र पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच इजिप्त आणि सेनेगल यांच्यातील लढतीत मोहम्मद सालाहसोबत प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. पेनाल्टी शूटआऊटवेळी मोहम्मद सालाह (Mohamed Salah) आणि इजिप्तचा गोलकिपर मोहम्मद अल्शेनावेसह इतर खेळाडूंच्या डोळ्यावर असंख्य लेझर्सचा (Laser Beams) मारा करण्यात आला होता. यावरुन मैदानातील सुरक्षिततेच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यात आता आणखी भर पडली आहे. मैदानात घुसून मेस्सीसोबत (Lionel Messi) एका चाहत्याने गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला आहे. अचानक घडलेल्या प्रकारानंतर मेस्सी गडबडला. यावर त्याने नाराजीही व्यक्त केलीये. पण एवढं सगळ होऊन चाहता त्याच्या क्षणभर भेटीनं दांडगाच खूश झाल्याचे दिसते.

अर्जेंटिना आणि इक्वाडोर यांच्यातील लढतीत भयावह प्रकार घडला. फिफा वर्ल्ड कप (FIFA World Cup 2022) साठीच्या पात्रता फेरीतील सामना एस्टेडिओ मोनूमेंटल बांको पिचिनच्या मैदानात रंगला होता. यावेळी प्रेक्षक गॅलरीतून एक व्यक्ती सुरक्षा कवच भेदून थेट मैदानात घुसला. तो अर्जेंटिनाचा कर्णधार आणि स्टार स्ट्रायकर लिओनेल मेस्सीच्या (Lionel Messi) गळ्यातच पडला. या व्यक्तीने मेस्सीसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्नही केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मेस्सी भडकल्याचे दिसले. त्याने कॅमेरा लेन्स बाजूला करण्यास सांगितले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी या व्यक्तीला मैदानाबाहेर नेले. या प्रकारामुळे फुटबॉल मैदानात सामना सुरु असताना खेळाडूंच्या सुरक्षिततेचा मुद्दा आणखी गंभीर झाल्याचे दिसून येत आहे.

संबंधित व्यक्तीनं या प्रकाराचा व्हिडिओ आपल्या इन्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. एवढेच नाही तर या फुटबॉल प्रेमीने मेस्सीच्या कौतुकात भली मोठी पोस्टही लिहिलीये. आयुष्य जगण्यासाठी एका संधीची गरज असते. मला ती मिळाली. मी सर्वकालीन महान खेळाडूला भेटलो ही गोष्ट आयुष्य सार्थक लागल्याप्रमाणे आहे. फुटबॉलच्या मैदानात मेस्सीने आपल्या कामगिरीने अनेक अविस्मरणीय क्षणाची अनुभूती दिलीये. फुटबॉल आणि मेस्सीवरील प्रेम मनात कायम राहिल, असा उल्लेख या व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये केलाय.

वर्ल्ड कप पात्रता फेरीतील अखेरच्या सामन्यात इक्वाडोर आणि अर्जेंटिना यांच्यातील लढत 1-1 अशी बरोबरीत सुटली. दक्षिण अमेरिकेतील चार संघ फिफा वर्ल्ड कपसाठी पात्र ठरल्या आहेत. यात अर्जेंटिना, ब्राझील, उरुग्वे आणि इक्वाडोर यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT