football league
football league 
क्रीडा

खबरदार.. मैदानावर थूंकू नका..! वाचा कोणी दिलाय हा इशारा...

सकाळवृत्तसेवा

लंडन : युरोपातील सर्वाधिक चर्चेच्या असलेल्या इंग्लंडमधील प्रीमियर लीग फुटबॉलला उद्या (ता. 17) बुधवारपासून सुरुवात होत आहे. मैदानावर थुंकण्यास तसेच नाक शिंकरण्यास पूर्णपणे मनाई करीत या लीगला सुरुवात होणार आहे; पण युरोपातील अन्य लीगच्या तुलनेत जास्त म्हणजे तीनशे जणांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्याचा निर्णय प्रीमियर लीगने घेतला आहे.

गोलचा आनंद व्यक्त करताना एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे, हस्तांदोलनास मनाई करतानाच मैदानात थुंकण्यास तसेच नाक शिंकरण्यास प्रतिबंध आहे. त्याचबरोबर सामन्यापूर्वी तसेच सामन्यानंतर हात निर्जंतुक करण्याची स्पष्ट सूचना आहे. मैदानावर सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी तांत्रिक अधिकारीही एकमेकांपासून दूर असतील. त्यासाठी मैदानावर खुणा करण्यात आल्या आहेत.

तीन महिन्यांनंतर पुनरागमन करीत असलेल्या या लीगने मैदानात तीनशे जणांना प्रवेश देण्याचे ठरवले आहे. ला लिगाने ही संख्या दोनशेच्याही खाली ठेवली आहे; तर जर्मनी लीगने सव्वादोनशेपर्यंत मर्यादित ठेवली होती. मात्र प्रीमियर लीगने मेडिकल तसेच आवश्यक स्टाफची संख्या वाढवली आहे. अर्थात त्यामुळे मैदानाचे रेड, अम्बर आणि ग्रीन झोन केले आहेत. रेड झोनमध्ये केवळ वीस खेळाडू, बारा मार्गदर्शक तसेच वैद्यकीय अधिकारी असतील.

महत्त्वाच्या सूचना

  • सामन्यापूर्वी तसेच सामन्यानंतर खेळाडूंची कोरोना चाचणी
  • पूर्वार्ध तसेच उत्तरार्धात प्रत्येकी एक ड्रिंक ब्रेक
  • सामन्यापूर्वी प्रीमियर लीग अँथम होणार, पण खेळाडू त्या वेळीही सुरक्षित अंतर ठेवणार
  • बॉलबॉय तसेच बॉलगर्ल्सचे संघांना साह्य नसणार. त्यामुळे खेळाडूंनाच चेंडू मैदानात आणावा लागणार
  • प्रतिस्पर्धी खेळाडू अथवा सामनाधिकाऱ्यांभोवती गर्दी करण्यास मनाई
  • खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये असेपर्यंत मास्कची सक्ती
  • संघांचा शक्यतो विमानाने प्रवास, तसेच रस्त्यावरील प्रवासासाठी किमान तीन बस
  • सामन्यापूर्वी हॉटेलमधील मुक्काम टाळण्यास प्राधान्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : सायना नेहवाल, राजकुमार राव यांचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT