
भिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेली. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मोठी भरारी घेण्याच्या बेतात असतानाच त्याने अकाली एक्झिट घेतली. त्यामुळे अख्खी इंडस्ट्री नि:शब्द झाली आहे. सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' लवकरच प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेली. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मोठी भरारी घेण्याच्या बेतात असतानाच त्याने अकाली एक्झिट घेतली. त्यामुळे अख्खी इंडस्ट्री नि:शब्द झाली आहे. सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' लवकरच प्रदर्शित होणार आहे. तो ओटीटीवर प्रदर्शित होईल असे बोलले जात आहे. मात्र, सुशांतच्या चाहत्यांनी हा चित्रपट आम्हाला मोठ्या पडद्यावरच पाहायचा आहे. तो ओटीटीवर प्रदर्शित करू नये, अशा प्रकारचे मॅसेज समाज माध्यमांवर टाकायला सुरुवात केली आहे.
बॉलीवूडच्या पडद्यामागील 'तो' काळाकुट्ट अंधारच ठरतोय घातक...
दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी 'दिल बेचारा' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहेत. मुकेश छाब्रा हे हिंदी चित्रपटसृष्टीत कास्टिंग डिरेक्टर म्हणून खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी आतापर्यंत कित्येक चित्रपटांमध्ये नवोदितांची नावे निर्माता व दिग्दर्शकांना सुचविली आहेत आणि त्यांना त्या त्या चित्रपटात कामाची संधी मिळाली आहे. 'दिल बेचारा' या चित्रपटाद्वारे ते दिग्दर्शनात पदार्पण करीत आहेत.
टी-20 विश्वचषकाबाबत भारताचे दबावतंत्र; ऑस्ट्रेलियन पंतप्रधान आणि क्रिकेट मंडळात मात्र मतभिन्नता...
'दिल बेचारा' चित्रपटातून संजना सांघी ही नवोदित अभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. अभिनेता सैफ अली खानची या चित्रपटात विशेष भूमिका आहे. शशांक खेतान यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. सध्या लॉकडाऊन आहे आणि चित्रपटगृहे बंद आहेत. त्यामुळे काही चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. आज दिवसभर सुशांतचा 'दिल बेचारा' हा ओटीटीवर येणार असल्याची चर्चा होती.
आता कस्तुरबात दिवसाला ८०० चाचण्या करणं होणार शक्य, कारण कस्तुरबात आलंय 'हे' नवीन मशीन
मात्र, सुशांतच्या चाहत्यांनी आपल्याला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायचा आहे. ओटीटीवर हा चित्रपट प्रदर्शित केल्यास त्याला न्याय मिळणार नाही. आम्हाला हा चित्रपट मोठ्या पडद्यावरच पाहायचा आहे. त्यासाठी आम्हाला काही महिने थांबायला लागले तरी काही हरकत नाही, असे सुशांतच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर मॅसेज टाकले आहे.