Anwar Jackson return to squad for World Cup qualifiers Sakal
क्रीडा

विश्‍वकरंडक पात्रता फेरीसाठी अन्वर, जिक्सनचे संघात पुनरागमन

फिफा विश्‍वकरंडक (२०२६) व एएफसी आशियाई करंडक (२०२७) या दोन्ही महत्त्वाच्या स्पर्धांच्या पात्रता फेरीतील अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतींसाठी भारतीय फुटबॉल संघाची घोषणा गुरुवारी करण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : फिफा विश्‍वकरंडक (२०२६) व एएफसी आशियाई करंडक (२०२७) या दोन्ही महत्त्वाच्या स्पर्धांच्या पात्रता फेरीतील अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतींसाठी भारतीय फुटबॉल संघाची घोषणा गुरुवारी करण्यात आली.

भारताच्या संभाव्य ३५ खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली असून मध्य बचावफळीतील खेळाडू अन्वर अली व बचावफळीतील खेळाडू जिक्सन सिंग यांचे पुनरागमन झाले आहे.

मोहन बागानचा स्टार खेळाडू अन्वर अली घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे मागील वर्षी फुटबॉलपासून दूरच होता. जानेवारी महिन्यातील आशियाई करंडकातही तो खेळू शकला नाही. तसेच मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात डाव्या खांद्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे जिक्सन सिंगही बाहेरच होता.

सहा दिवसांत दोन वेळा लढणार

फिफा विश्‍वकरंडकाच्या पात्रता फेरीत भारतीय फुटबॉल संघाचा अ गटात समावेश आहे. या गटात भारतासह कतार, कुवेत व अफगाणिस्तानचा समावेश आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघ उर्वरित तीन देशांशी दोन वेळा लढणार आहेत. भारतीय संघाने कुवेतला पराभूत केले असून कतारकडून मात्र त्यांना हार पत्करावी लागली आहे.

आता २१ ते २६ मार्च या दरम्यान भारतीय संघ अफगाणिस्तानशी दोन वेळा भिडणार आहे. २१ मार्च रोजी सौदी अरेबियामध्ये अफगाणिस्तानशी दोन हात केल्यानंतर २६ मार्च रोजी गुवाहाटी येथे भारतीय संघ त्यांना टक्कर देणार आहे. साखळी फेरीत दमदार कामगिरी केल्यानंतर भारतीय संघाकडे तिसऱ्या फेरीत पोहोचून इतिहास रचण्याची संधी असणार आहे.

संभाव्य संघ : गोलरक्षक : गुरप्रीत सिंग संधू, अमरिंदर सिंग, फुर्बा तेम्पा लाचेंपा, विशाल केथ. बचावपटू : आकाश मिश्रा, लालचुंगनुंगा, मेहताब सिंग, प्रितम कोटाल, राहुल भेके, निखिल चंद्रशेखर पुजारी, सुभाशिष बोस,

नरेंदर, अन्वर अली, रोशन सिंग, अमेय गणेश रानावडे, जय गुप्ता. मधली फळी : अनिरुद्ध थापा, ब्रँडन फर्नांडिस, लिस्टन कोलॅको, महेश सिंग, शाहल अब्दुल सामद, सुरेश सिंग, जिक्सन सिंग, दीपक तांगडी, एल. ख्वालरिंग, एल. राल्टे, इमरान खान. आक्रमक फळी : सुनील छेत्री, इशान पंडिता, एल. छांगटे, मानवीर सिंग, विक्रम प्रताप सिंग, राहुल प्रवीण, नंदकुमार सेकर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaghcha Raja Look: लालबागचा राजा २०२५ चा पहिला लूक समोर, प्रथम दर्शनातून दिसली पहिली झलक, पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Nagpur Fraud;'बेटिंग ॲप’द्वारे किराणा व्यापाऱ्याची २६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT