Diego Maradona
Diego Maradona  google
क्रीडा

मॅराडोनाची विकणार संपत्ती, व्हिलापासून सिगारचाही समावेश

सकाळ डिजिटल टीम

अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना (Diego Maradona) याच्या संपत्तीचा आज लिलाव होणार आहे. २०२० मध्ये त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या जवळपास ९० वस्तूंचा आज लिलाव (Auction) होणार आहे. या वस्तूंच्या लिलावाचं आयोजन करणारे एड्रियन मर्काडो (Adrian Mercado) यांनी शनिवारी सांगितलं की, आमच्याकडे 1120 लोकांनी नोंदणी केली केली असून ते लिलावात बोली लावण्याच्या तयारीत आहेत. अर्जेंटिनाच्या अधिकार्‍यांनी मॅराडोनाच्या संपत्तीच्या वारसांशी करार करून विक्रीचे आदेश दिले होते.

Maradona Villa

या वस्तूंचा होणार लिलाव

मॅराडोनाने आपल्या आई-वडिलांना १९८० च्या दशकात ब्युनोस आयर्सचा व्हिला डेव्होटो (Villa Devoto) हा व्हिला भेट म्हणून दिला होता. तिथे मॅराडोना मृत्यूपर्यंत राहत होता. या व्हिलाचा लिलाव होणार आहे. तेथे एक स्विमिंग पूलही आहे. यासाठी $900,000 ची किमान बोली निश्चित करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त 2017 आणि 2016 च्या मॉडेल्स असलेल्या दोन बीएमडब्ल्यूसाठी 225,000 आणि 165,000 डॉलर किमान बोली लावण्यात आली आहे. तसेच 38,000 डॉलरची मूळ किंमत असलेली Hyundai व्हॅनचाही लिलाव करण्यात येणार आहे. ब्युनोस आयर्सच्या दक्षिणेस एक दोन बेडरूमचे अपार्टमेंट असून त्याची मूळ किंमत $65,000 आहे. क्युबातील दिवंगत नेते फिदेल कास्त्रो यांच्यासोबतचा मॅराडोना चा एक फोटो आणि क्युबा सिगार, कास्त्रो यांनी सही केलेल्या हस्तलिखित पत्राचाही (Handwritten Letter) आजच्या लिलावात समावेश असणार आहे. याविषयी एड्रियन मर्काडो म्हणाले की, ऑफर केल्या जाणार्‍या 87 लॉटमध्ये कमीत कमी बोली $50 ते $900,000 पर्यंत लावल्या जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर प्रकरणातील अटकेतील डॉक्टरांच्या अडचणी वाढणार? पोलिसांकडून डॉ. तावरेसह हाळनोरच्या निलंबनाचा प्रस्ताव

Rishabh Pant: 'एअरपोर्टवरही जात नव्हतो, कारण...' टी20 वर्ल्ड कप खेळण्यापूर्वी पंतने सांगितला अपघातानंतरचा अनुभव

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर अपघातातील आरोपीला मद्य देणाऱ्या कोझी व ब्लॅकच्या मालकांसह इतरांचे जामिनासाठी अर्ज; उद्या सुनावणी

Fact Check: कंगणा राणौतचा अबू सालेमसोबत फोटो व्हायरल झाल्याचा 'तो' दावा खोटा

Pune Porsche Car Accident: बालसुधारगृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीचा 'असा' आहे दिनक्रम; पहाटे उठून करावी लागते प्रार्थना अन्...

SCROLL FOR NEXT