Former Indian Coach Lalchand Rajput Is A Master Mind Of Zimbabwe Historical Win Against Pakista esakal
क्रीडा

PAK vs ZIM : पाकला धूळ चारण्याऱ्या झिम्बाब्वेच्या मागे भारतीय हात; धोनीच्या वर्ल्डकप विजयातही होते वाटेकरी

अनिरुद्ध संकपाळ

PAK vs ZIM Lalchand Rajput : झिम्बाब्वेने पाकिस्तानचा अवघ्या 1 धावेने पराभव करून यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमधील दुसरा मोठा उलटफेर केला. यापूर्वी आयर्लंडने इंग्लंडचा 5 धावांनी पराभव केला होता. मात्र यात आयर्लंडला पावसाची साथ लाभली होती. दुसरीकडे झिम्बाब्वेने पाकिस्तानसमोर फक्त 131 धावांचे आव्हान ठेवूनही झुंजार खेळीच्या जोरावर त्यांना मात दिली. झिम्बाब्वेने पाकिस्तानला मात दिल्यानंतर संघातील खेळाडू एकमद प्रसिद्धीच्या झोतात आला. मात्र या झुंजार झिम्बाब्वेचा संघ उभारण्यात एका भारतीयाचा मोठा वाटा आहे. या भारतीय व्यक्तीमुळेच आज झिम्बाब्वे संघाला सिंकदर रझा, क्रेग विलियम्स, शॉन इर्विन आणि ब्रँडन टेलर यासारखे खेळाडू मिळाले.

या भारतीय व्यक्तीचे नाव आहे लालचंद राजपूत. हो हे तेच लालचंद राजपूत आहेत त्यांनी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात जिंकलेल्या 2007 चा पहिला वहिला टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताचे प्रशिक्षकपद भुषवले होते. झिम्बाब्वे संघाचे जुलै 2018 मध्ये प्रशिक्षक झालेल्या राजपूत यांनी झिम्बाब्वेने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी 2018 मध्ये पहिल्यांदा प्रशिक्षक झाल्यावरचा एक किस्सा सांगितला.

ते म्हणाले की, '2018 मध्ये मी प्रशिक्षक झाल्यावर पुढच्याच दिवशी पाकिस्तानविरूद्ध पाच सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात येणार होती. यावेळी मला झिम्बाब्वे क्रिकेटने सांगितले की शॉन इर्विन, क्रेग विलियम्स, सिकंदर रझा आणि ब्रँडन टेलर हे बोर्डासोबत मानधनाच्या वादामुळे ही मालिका खेळणार नाहीयेत. ही मालिका आपण रद्द करू शकतो नाही आपल्याला अनुभव नसलेली टीम घेऊन मालिका खेळावी लागणार आहे.' राजपूत म्हणाले की या मालिकेत आमची कामगिरी अत्यंत खराब झाली. यावेळी मला समजले की गोष्टी बदलण्यासाठी आपल्याला थोडा काळ वाट पहावी लागेल.

आता याच खेळाडूंनी गेल्या काही काळापासून झिम्बाब्वेसाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. झिम्बाब्वेने पाकिस्तानला मात देत टी 20 वर्ल्डकपमध्ये मोठा धमाका केला. याबाबत बोलताना लालचंद राजपूत म्हणाले की, 'आम्ही 2019 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये पात्रता फेरी पार करण्यात अयशस्वी ठरलो. त्यानंतर संघ आंतरराष्ट्रीय स्तरावरून निलंबित झाला. हा झिम्बाब्वे क्रिकेटसाठी सर्वात खराब काळ होता. अशा कठिण परिस्थितीमधून देखील फक्त चार वर्षात संघाने जोरदार मुसंडी मारत एका कसोटी खेळणाऱ्या संघाविरूद्ध दमदार कामगिरी केली. मला या बदलाचा अभिमान वाटतो आहे.'

झिम्बाब्वे संघाचे सध्याचे तांत्रिक निर्देशक लालचंद राजपूत पाकिस्तानवरील विजयामुळे फार खूष आहेत. यावर राजपूत म्हणाले की, 'झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियातील टी 20 वर्ल्डकपमध्ये पात्र व्हावे हे माझे स्वप्न होते. पाकिस्तानवरचा विजय म्हणजे 'सोने पे सुहागा'. मला माझ्या खेळाडूंचा अभिमान आहे.'

राजपूत हे पात्रता फेरीपर्यंत संघासोबत होते. मात्र दिवळीसाठी ते आपल्या कुटुंबासोबत राहू इच्छित होते. त्यामुळे ते भारतात परतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ३१ धोत्रे खून प्रकरणात पोलिसांना शरण आलेल्या उद्धव निमसेंना २० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT