R Ashwin R Sridhar esakal
क्रीडा

R Ashwin : अश्विनने पहिल्याच भेटीत केला पाणउतारा; माजी कोचचा धक्कादायक खुलासा

अनिरुद्ध संकपाळ

R Ashwin R Sridhar : भारताची संघ मध्यंतरीच्या काळात जगातील काही सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघापैकी एक संघ म्हणून ओळखला जात होता. यामागे भारताचे माजी फिल्डिंग कोच आर श्रीधर यांचे परिश्रम होते. हैदराबादचे माजी फिरकीपटू आर. श्रीधर यांनी 2014 मध्ये भारतीय संघाचे फिल्डिंग कोच म्हणून कार्यभार स्विकारला होता. मात्र त्यांची टीम इंडियाबरोबरची सुरूवात फार चांगाली झाली नव्हती. याबाबतचा एक खुलासा आर. श्रीधर यांनी नुकताच केला. त्यांनी आर. अश्विनचा सुरूवातीला त्यांच्या फिल्डिंग ड्रील्सबाबत कसा दृष्टीकोण होता हे त्यांनी सांगितले.

आर. श्रीधर म्हणाले की, 'आर. अश्विनने वाद घालायचा म्हणून नाही मात्र विचारले की, तुला जर राग येणार नसेल तर श्रीधर सर मी तुमचं का ऐकू आणि तुमच्या फिल्डिंग ड्रिल्स आणि सल्ले का फॉलो करू. मी तुम्ही सांगितलेलं का ऐकू? 2011 पासून 2014 पर्यंत ट्रेव्हर पेन्नी फिल्डिंग कोच होते. आता तुम्ही आला आहात. तुम्ही जवळपास दोन ते तीन वर्षे रहाल असं आपण पकडून चालू.'

'अश्विन पुढे म्हणाला की, 'तुम्हा काहीतरी सांगाल नंतर निघून जाल. नवीन फिल्डिंग कोच येईल. खरं सांगू तर पुढच्या दोन ते तीन वर्षात माझं खूप काही पणाला लागलेलं असेल. मला खात्री पटायला हवी की तुम्ही जे सांगताय त्याचा मला फायदा होईल. याचा माझ्या खेळात मला फायदा होईल. नाहीतर मी तुमचं का ऐकू?'

श्रीधर यांनी सांगितले की अश्विनसोबतचे हे संभाषणामुळे अश्विनला त्याच्या फायदा होईल असे बदल करणे गरजेचे असल्याचे जाणवले. श्रीधर म्हणाले की, 'यानंतर आम्ही दोघे एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखू लागलो. मी तो काय म्हणतोय हे लगेच ओळखून गेलो. त्याचे प्रश्नांनी मला मी किती प्रशिक्षण देऊ आणि प्रशिक्षण नेमकं काय आहे याबाबत विचारात पडलो.'

(Sports Latest News)

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inside Story Maharashtra Farmers : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची बंद दाराआड काय घडली चर्चा, राजू शेट्टींनी सांगितली इनसाईड स्टोरी...

Suhas Shetty Case : बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येमागे PFI चा कट उघड, NIA चा धक्कादायक अहवाल, 11 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

Latest Marathi News Live Update : खोट्या मतदार यादीविरोधात ठाकरे गटाचा उद्या मुंबईत मोर्चा

Bhandara Heavy Rain: भंडारा जिल्ह्यात पावसामुळे हाहाकार; खरीप हंगामातील धान पिकाची राखरांगोळी, नुकसानीमुळे बळीराजा संकटात

Kolhapur MPSC Student : एमपीएससीत कोल्हापूरचा डंका! कसबा बावड्याची सायली राज्यात दुसरी, इचलकरंजीचा तन्मय सातवा

SCROLL FOR NEXT