Arun Lal esakal
क्रीडा

Team India : टीम इंडियाचा माजी खेळाडू दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर

सकाळ डिजिटल टीम

बाॅलिवूड पाठोपाठ आता क्रीडाविश्वातही काहीजण लग्न बंधनात अडकत आहेत.

बाॅलिवूड (Bollywood) पाठोपाठ आता क्रीडाविश्वातही काहीजण लग्न बंधनात अडकत असून टीम इंडियाच्या (Team India) माजी सलामीवीरानंही लग्न करण्याचा निर्णय घेतलाय; पण हे त्याचं दुसरं लग्न असणार आहे. वयाच्या 66 व्या वर्षी तो दुसरं लग्न करणार असून त्याच्या होणाऱ्या पत्नीचं नाव बुलबुल आहे.

विशेष म्हणजे, बुलबुल 38 वर्षांची असून होणाऱ्या पतीपेक्षा अर्थात अरुण लालपेक्षा (Arun Lal) ती 28 वर्षांहून लहान आहे. अरुण लाल आणि बुलबुल यांची बऱ्याच काळापासून मैत्री आहे. आता त्यांनी मैत्रीला नव्या नात्यात गुंफण्याचा निर्णय घेतलाय. एक महिन्यापूर्वी दोघांनी साखरपुडा केला होता. आता अरुण लाल यांनी लग्नाच्या पत्रिकाही छापल्या असून जवळच्या मित्रांना, नातेवाईकांना आमंत्रण देण्यास सुरुवात केलीय.

Wedding magazine

2 मे रोजी कोलकातातील (Kolkata) पियरलेस हॉटेलमध्ये लग्न होणार असून लग्नानंतर रिसेप्शनही होणार आहे. अरुण लाल यांच्या पहिल्या पत्नीचं नाव रिना आहे. दोघांनी घटस्फोट घेतलाय. रिना बऱ्याच कालावधीपासून आजारी आहे आणि तिच्या मर्जीनेच अरुण लाल यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. अरुण लाल यांनी टीम इंडियाकडून 16 कसोटी आणि 13 एक दिवसीय सामने खेळले आहेत. यात त्यांनी अनुक्रमे 729 आणि 122 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20I : अक्षर पटेल दुखापतीमुळे बाहेर? त्याच्या जागेसाठी ३ खेळाडूंचा दावा; जाणून घ्या भारताची प्लेइंग इलेव्हन

छोट्या मुलासारखी आईची काळजी घेतोय सनी देओल; प्रकाश कौर यांना हाताला धरून नेणाऱ्या अभिनेत्याला पाहून नेटकरी भावुक; म्हणतात-

Miraj Election : नाराज कुणाच्या वाटेवर? मिरज तालुक्यात निवडणूकपूर्व राजकीय हालचालींना वेग

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता

"स्मृतीच्या नावाने त्या संपूर्ण कुटूंबाने पैसे उकळले" पलाशसकट सगळ्यांवर निर्मात्याने लावले आरोप !

SCROLL FOR NEXT