simona halep File Photo
क्रीडा

Simona Halep: डोपिंगप्रकरणी टेनिसपटू सिमोना हालेप निलंबित; म्हणाली आता आयुष्यातील...

सकाळ डिजिटल टीम

माजी जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू सिमोना हालेपला डोपिंगप्रकरणी तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस इंटिग्रिटी एजन्सीने म्हटले आहे की, हालेपवर बंदी घातलेल्या औषधांचे सेवन केल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईनंतर हालेपने सोशल मीडियावरील एका लांबलचक पोस्टमध्ये आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर तिने लिहिले की, तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण लढाई सुरू झाली आहे.

या कारवाईनंतर हालेपने सोशल मीडियावरील एका लांबलचक पोस्टमध्ये आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर तिने लिहिले की, तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण लढाई सुरू झाली आहे.

यूएस ओपन दरम्यान हॅलेपची चाचणी घेण्यात आली होती. त्यातील तिच्या ए आणि बी दोन्ही नमुन्यांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. डोपिंगविरोधी नियमाच्या कलम ७.१२.१ अन्वये ३१ वर्षीय हालेप हिला निलंबित करण्यात आले आहे. सिमोनाने दोन ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.

तात्पुरती बंदी घातल्यानंतर सिमोना हालेपने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक लांबलचक पोस्ट टाकून स्पष्टीकरण दिलं आहे. "आजपासून माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण सामन्याची सुरुवात होत आहे. सत्याची लढाई. मला सांगण्यात आले की डोप टेस्टमध्ये माझ्यातील रॉक्सॅडुस्टॅट अल्प प्रमाणात आढळून आले आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का आहे. संपूर्ण कारकीर्दीत कधीही फसवणुकीचा विचार माझ्या मनात आला नाही. कारण ते मला शिकवलेल्या सर्व मूल्यांच्या विरुद्ध आहे. मी अतिशय अन्यायकारक परिस्थितीला तोंड देत आहे. मला पूर्णपणे गोंधळल्यासारखे आणि फसवल्यासारखे वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT