Formula 1  esakal
क्रीडा

F1 Live Streaming In India : एफ 1 च्या भारतीय चाहत्यांसाठी खुशखबर; जाणून घ्या कधी अन् कुठं पाहता येईल लाईव्ह स्ट्रिमिंग

अनिरुद्ध संकपाळ

Formula 1 Live Streaming In India : फॉर्म्युला 1 च्या भारतातील चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. फॉर्म्युला 1 चा 2024 आणि 25 चा हंगामाचे भारतात लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे. फॅनकोडने फॉर्म्युला 1 च्या भारतातील ब्रॉडकास्टचे 2024 आणि 2025 चे हक्क मिळवले आहेत.

एफ 1 चा 2024 चा हंगाम हा सर्वात मोठा हंगाम ठरणार आहे. या हंगामात एका कॅलेंडर वर्षात 24 शर्यती होणार आहेत. फॅनकोडने सलग दोन हंगामासाठी भारतातील लाईव्ह स्ट्रिमिंगचे हक्क मिळवले आहेत. यामुळे भारतीय चाहत्यांना स्वस्तात फॉर्म्युला 1 चे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येणार आहे.

फॅनकोड फक्त एफ 1 च्या शर्यती लाईव्ह स्ट्रीम करणार नसून ते सरावाचे आणि पात्रता फेरीचे देखील मोफत लाईव्ह स्ट्रिमिंग करणार आहेत. गेल्या वर्षी फॉर्म्युला 1 चे ब्रॉडकास्टिंग हे डिस्ने हॉटस्टार करत होते. त्यांचा करार संपल्यानंतर भारतात एफ 1 ला ब्रॉडकास्टर मिळाला नव्हता. त्यामुळे चाहत्यांना एफ 1 टीव्ही प्रो सबस्क्राईब करावं लागत होतं.

एफ 1 च्या लाईव्ह स्ट्रिमिंगची डील क्रॅक केल्यानंतर फॅनकोडचे सह संस्थापक यानिक कोलाको म्हणाले की, 'फॉर्म्युला 1 हे जगातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स इव्हेंट पैकी एक आहे. त्यांच्याशी भागीदारी करणे आमच्यासाठी रोमांचकारी असणार आहे.'

'आम्ही भारतातील लाखो प्रेक्षकांसाठी फॉर्म्युला वनचा थरार घेऊन येत आहोत. आम्ही एफ 1 च्या चाहत्यांना एक जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी सज्ज आहोत. देशातील जास्तीजास्त प्रेक्षकांपर्यंत हा खेळ पोहचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.'

भारतीय चाहत्यांचे हजारो रूपये वाचणार

फॉर्म्युला 1 च्या गेल्या हंगामात डिस्ने हॉटस्टारचा करार संपुष्टात आला होता. त्यांनी तो पुढे कायम ठेवण्यात कोणताही रस दाखवला नाही. त्यामुळे 2022 मधील फॉर्म्युला 1 शर्यती पाहण्यासाठी भारतीय चाहत्यांना F1TV चे सबस्क्रिप्शन घ्यावे लागले. याची वार्षिक फी 2999 इतकी होती. मात्र आता फॅनकोड फॉर्म्युला वनचे लाईव्ह स्ट्रिमिंग हक्क दोन हंगामासाठी मिळवल्याने भारतीय चाहत्यांना दर्जेदार शर्यतींचा स्वस्तात आनंद घेता येणार आहे.

फॅनकोडने चाहत्यांसाठी काही भन्नाट पॅकेज ऑफर केले आहेत. पहिला आहे विकएन्ड पास, यात हंगामातील पहिला राऊंड हा 49 रूपयात पाहता येणार आहे. तर पूर्ण हंगाम पाहण्यासाठी 599 रूपयांचे सबस्क्रिप्शन ठेवण्यात आले आहे.

याबरोबर अल्टिमेट लाईव्ह स्ट्रिमिंग पास हा देखील ऑप्शन आहे. यात फॉर्म्युला 1 सोबतच क्रिकेट, फुटबॉल आणि इतर खेळांचे देखील कव्हरेज मिळणार आहे. याचे वर्षाचे सबस्क्रप्शन हे महिन्याला 199 आणि वर्षाला 999 रूपये इतके आहे. फॉर्म्युला 1 च्या सर्व शर्यती या स्काय स्पोर्ट्स एफ 1 च्या समालोचनासह स्ट्रीम होणार आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT