Badlapur Stadium
Badlapur Stadium sakal
क्रीडा

Badlapur Stadium : बदलापुरात आंतरराष्ट्रीय स्टेडियम ; केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पाच कोटींच्या कामाची पायाभरणी होणार

सकाळ वृत्तसेवा

बदलापूर : देशातील महत्त्वाची शहरे त्यात मुंबई शहरात असलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील वानखेडे, ब्रेबॉर्न, डी. वाय. पाटील स्टेडियमच्या धर्तीवर आता ठाणे जिल्ह्यात बदलापूर शहरामध्ये भव्य आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्टेडियम उभारण्यात येत आहे. या स्टेडियमची पायाभरणी शनिवारी (ता. २) केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते होणार आहे. माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे बदलापुरातील क्रीडाप्रेमींना मोठी भेट सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे बदलापूर शहराला एक वेगळे वलय प्राप्त होणार आहे.

कुळगाव बदलापूर नगर परिषद हद्दीतील विकास आराखडामधील, प्रभाग क्रमांक १८ सर्व्हे क्रमांक ५९ ही डीपीमध्ये आरक्षित असलेली जागा नगरपालिकेच्या ताब्यात असून, या जागेवर भव्य असे क्रीडा स्टेडियम तयार करण्यासाठी, जिल्हा वार्षिक योजना सुवर्ण जयंती नगरोत्थानअंतर्गत, जवळपास पाच कोटींचा निधी मंजूर होणार असून, या माध्यमातून या स्टेडियमची पायाभरणी शनिवारी केली जाणार आहे.

बदलापूर शहरात आंतरराष्ट्रीय स्टेडियम उभारण्यासाठी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. त्याचबरोबर त्यांच्या या संकल्पनेला केंद्रीय राजमंत्री कपिल पाटील यांनीदेखील पाठिंबा दिला. ठाणे जिल्ह्यात त्याचबरोबर, कर्जत तालुक्यापर्यंतच्या ग्रामीण भागात तयार होणाऱ्या खेळाडूंना, मुंबई शहरात सरावाला जाण्यापेक्षा बदलापुरातच सराव आणि त्यापाठोपाठ, पुढे जाऊन राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय सामनेदेखील या माध्यमातून भरवले जातील, आणि त्यातून खऱ्या अर्थाने बदलापूर शहराच्या अर्थकारणाला चालना मिळेल, असा विश्वास राजेंद्र घोरपडे यांनी व्यक्त केला आहे.

स्टेडियमचे स्वरूप कसे असणार?

सुमारे १८ एकर जागेत उभ्या राहणाऱ्या या स्टेडियमची बांधणी ही वानखेडे स्टेडियमच्या धर्तीवर होणार असून, या ठिकाणी साधारण २० ते २५ हजार इतकी आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी खेळाडूंसाठी ड्रेसिंग रूम, प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या गॅलरी, लॉबी, बसण्यासाठी आरामदायी आसन व्यवस्था, प्रसाधनगृह, खानपानाच्या सोयी, स्वच्छतागृह या सुविधा दिल्या जाणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने उच्च दर्जाची सेवा पुरवली जाणार आहे. तसेच या ठिकाणी गो ग्रीन संकल्पनेअंतर्गत खेळपट्टी, जिथे क्रिकेट, फुटबॉल असे राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाऊ शकतील. यासाठी पार्किंगची सोय, वॉटरप्रूफिंग, ऑरगॅनिक फर्टिलायझरचा वापर करत खेळपट्टी उभारली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT