Four Japanese basketball players removed
Four Japanese basketball players removed 
क्रीडा

जपानच्या चार बास्केटबॉलपटूंची हकालपट्टी 

सकाळवृत्तसेवा

जाकार्ता : संघ शिस्त मोडून साखळी सामन्यातील विजयानंतर जल्लोषाच्या भरात "रेड लाइट'चा फेरफटका मारणाऱ्या आणि वेश्‍यांवर पैसे उधळणाऱ्या जपानच्या चार बास्केटबॉलपटूंना आशियाई क्रीडा स्पर्धेतून मायदेशात हाकलून देण्यात आले आहे. जपान संघ व्यवस्थापनाने सोमवारी ही कारवाई केली. 

स्पर्धेच्या अधिकृत उद्‌घाटन सोहळ्यापूर्वीच बास्केटबॉल सामन्यांना सुरवात झाली. गेल्या आठवड्यात गुरुवारी साखळी सामन्यात कतारविरुद्ध 82-71 असा विजय मिळविल्यानंतर जपानचे चार बास्केटबॉलपटू क्रीडा ग्राममधून बाहेर पडले, ते थेट "रेड लाइट' परिसरातच फिरायला गेले. जपानमधीलच एका दैनिकाच्या पत्रकाराने ही घटना उघडकीस आणली. हे चारही खेळाडू जपानच्या अधिकृत जर्सी परिधानकरूनच फिरायला गेले होते. या खेळाडूंची कृती ही जपानची प्रतिमा डागाळणारी असल्याचे कारण देत चौघांनाही तातडीने जपानला रवाना होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या चार खेळाडूंमध्ये युया नागायोशी, ताकुया हाशिमोटो, ताकुमा साटो आणि केईटा इमामुरा यांचा समावेश आहे. या चारही खेळाडूंवर अधिक कडक कारवाई करण्याचे संकेत जपान बास्केटबॉल महासंघाने दिले आहेत. 
जपान पथकाचे प्रमुख याशुहिरो यामाशिता यांनी झाल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला असून, देशवासीय आणि स्पर्धा संयोजकांची माफी मागितली आहे. यामाशिता म्हणाले, ""ही गोष्ट निश्‍चितच लाजिरवाणी आहे. आम्ही देशवासीय आणि संयोजकांची माफी मागतो. अशा घटना इथून पुढे होणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल.'' 

अन्य खेळाडूंना इशारा 
याद राखा, असे काही कराल तर गय केली जाणार नाही, अशा शब्दांत आशियाई ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष शेख अहमद अल फहाद अल साबा यांनी इंडोनेशियात आलेल्या अन्य देशाच्या खेळाडूंना इशारा दिला. ते म्हणाले, "प्रत्येक स्पर्धेत अशा घटना घडतात हे दुर्दैवी आहे. खेळाडूंकडे उद्याची पिढी आदर्श म्हणून बघत असते. तुम्ही देशाचे प्रतिनिधीत्व करताना केवळ पदकाच्या शर्यतीत नसता, तर तुमच्या वर्तनातून देशाची प्रतिमादेखील ठरत असते. याचे भान खेळाडूंनी ठेवावे. जपानने केलेली कारवाई स्वागतार्ह असून, त्याचा अन्य देशांनी आदर्श घ्यावा.'' 

यापूर्वीच्या घटना 
-2014 : आशियाई स्पर्धेतील महिला स्वयंसेविकेस उद्देशून अश्‍लील शब्द वापरल्याने इराणच्या पदाधिकाऱ्याची हकालपट्टी. 
-2014 : क्रीडा ग्राममधील महिला कर्मचाऱ्याकडे अश्‍लील भावनेने बघितल्यामुळे पॅलेस्टाईन फुटबॉलपटूवर कारवाई. 
-2017 : राष्ट्रकुल स्पर्धेत फोटो शूट दरम्यान महिला खेळाडूशी अश्‍लील चाळे केल्याचा ऑस्ट्रेलियाच्या पदाधिकाऱ्यावर आरोप. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT