Indian Cricket Team
Indian Cricket Team Indian Cricket Team
क्रीडा

बीसीसीआयचा मोठा निर्णय; चार खेळाडूंना बोलावले मायदेशी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : रविवारी (ता. २४) भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना खेळला जाणार आहे. यामुळे संघ कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याच्या तयारीला लागला आहे. संघातील खेळाडू सराव सामन्यात मग्न असताना बीसीसीआने चार खेळाडूंना मायदेशी परतण्याचे आदेश दिले आहे. यामुळे खेळाडूंच्या सरावावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दोन सराव सामन्यात विजय मिळविल्यानंतर भारतीय संघ रविवारी पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. याच सामन्यातून भारत विश्वचषकाची सुरुवात करेल. पहिलाच सामना पाकिस्तानशी असल्याने सर्वांची धाकधूक चांगलीच वाढली आहे. अशात बीसीसीआयने युएईमध्ये पाठवलेल्या चार खेळाडूंना मायदेशी बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) फलंदाजांचा चांगला सराव व्हावा यासाठी काही खेळाडूंना नेट गोलंदाज म्हणून संघासोबत पाठवले होते. यात करण शर्मा, शाहबाज नदीम, कृष्णप्पा गौतम आणि व्यंकटेश अय्यर यांचा समावेश होता. बीसीसीआयच्या आदेशानंतर हे खेळाडू मायदेशी परतणार आहे. तर संघासोबत हर्षल पटेल, लुकमान मेरिवाला, आवेश खान, उम्रान मलिक हे तिघे राहणार आहे.

विश्वचषक संपल्यानंतर जास्त सराव सत्र होणार नाही आहे. त्यामुळे या गोलंदाजांना सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी परत बोलावण्यात आले आहे. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धा ४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या ट्रॉफीसाठी ३८ संघांना ६ गटांमध्ये विभागले गेले आहे. जिथे प्रत्येकी सहा संघांचे पाच एलिट गट तयार करण्यात आले आहेत. त्याचवेळी आठ संघांचा एक प्लेट ग्रुप देखील आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाषणाची सुरुवात नेहरुंच्या नावाने केली अन् मोदी तिसऱ्यांचा पंतप्रधान झाल्याचं राज ठाकरेंनी केलं जाहीर

गौतम अदानींनी तिच्यासाठी केला मदतीचा हात पुढे; जाणून घ्या काय आहे 'लवली'ची व्यथा!

Swati Maliwal: स्वाती मालिवाल भाजपच्या षडयंत्राचा भाग; 'आप'कडून घणाघाती आरोप

Mumbai Rally: पुतिन जसं विरोधकांना संपवतात, तसाच प्रयत्न मोदींकडून सुरु; अरविंद केजरीवाल यांचा घणाघात

Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल!

SCROLL FOR NEXT