Real Madrid eSakal
क्रीडा

Real Madrid : धक्कादायक! अल्पवयीन मुलीसोबत ठेवले संबंध, व्हिडिओ केला व्हायरल; रिअल माद्रिदच्या चार खेळाडूंवर गंभीर आरोप

Football News : या चौघांना अटक करुन, चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Sudesh

फुटबॉल जगतातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. रिअल माद्रिद यूथ टीममधील चार खेळाडूंना अटक करण्यात आलं आहे. एका अल्पवयीन मुलीसोबत संबंध ठेऊन, त्याचा व्हिडिओ शेअर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. स्पॅनिश पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, या सर्व खेळाडूंचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. या खेळाडूंची सर्च हिस्ट्री तपासण्यात आली, तसेच हा व्हिडिओ पुढे आणखी शेअर होऊ नये यासाठी पोलिसांनी पावलं उचलली आहेत. हे व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅप या मेसेजिंग अ‍ॅपवरुन शेअर करण्यात आले होते.

या चौघांना अटक करुन, चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. यातील तीन खेळाडू हे रिअल माद्रिदच्या सी-टीममधील आहेत. तर चौथा खेळाडू हा बी-टीममधील असल्याचं सांगण्यात आलं. क्लबला याबाबत विचारणा केली असता, या प्रकाराबाबत इंटर्नल इन्व्हेस्टिगेशन सुरू असल्याचं सांगितलं आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हिडिओमधील 16 वर्षीय मुलीच्या आईने कॅनरी आयलँड्समधील पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला. गुरुवारी (14 सप्टेंबर) पोलिसांनी या क्लबच्या चार खेळाडूंना अटक केली.

ब्रिटिश माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीने हे संबंध सहमतीने झाल्याचं म्हटलं आहे. मात्र, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि शेअरिंगबाबत आपल्याला माहिती नसल्याचं या मुलीने स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Circuit Bench : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी 75 एकर जागेचा मार्ग मोकळा! निवृत्त सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत कार्यक्रम; 16 ऑगस्टला होणार मोठी घोषणा?

लावणीच्या नावावर अश्लीलतेला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी घ्यावं लागेल प्रमाणपत्र, त्यानंतरच परवानगी; सरकारचा मोठा निर्णय

कार उलटल्यानंतर ट्रकला धडकली, चौघांचा जागीच मृत्यू; देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, ५ जण गंभीर

Shravan Belpatra Rules: बेलाचं पान कधी तोडावं? कधी तोडू नये? 'या' चुकांमुळे लागू शकतो दोष; जाणून घ्या योग्य नियम

Independence Day Live Update : बावनकुळेंचे स्वातंत्र्यदिनी विकसित महाराष्ट्राचे आवाहन

SCROLL FOR NEXT