gabba test win one year india vs australia  Sakal
क्रीडा

'टूटा है गाबा का घमंड...' तो क्षण अविस्मरणीयच!

सुशांत जाधव

Gabba Test Win oOne Year India vs Australia ऑस्ट्रेलियाच्या मैदानात 19 जानेवारी, 2021 रोजी ब्रिस्बेनच्या गाबाच्या मैदानात 23 वर्षीय रिषभ पंतने चौकार खेचत इतिहास रचला. रिषभ पंतच्या बॅटमधून चौकार आल्यानंतर या सामन्याची काँमेंट्री करणाऱ्या विवेक राजदान यांच्या तोंडून शब्द निघले होते ते म्हणजे "टूटा है गाबा का घमंड..." या मॅचसह टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका खिशात घातली होती. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात 36 धावांत ऑल आउट झालेल्या टीम इंडियानं (Team India) इतिहास रचला होता. पंतशिवाय अन्य खेळाडूंनी हिरोपंती दाखवून दिली होती.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेची टीम इंडियाची (Team India) सुरुवात खराब झाली होती. पिंक बॉलवरील कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दुसरा डाव अवघ्या 36 धावांत आटोपला होता. भारतीय संघाची कसोटी इतिहासातील ही सर्वात खराब कामगिरी होती. या सामन्यानंतर किंग कोहली मायदेशी परतला. त्याच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाचे ओझे हे अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) खांद्यावर आले. पहिल्या सामन्यातील मानहानिकारक पराभवानंतर टीम इंडिया इतिहास रचेल, असे कुणालाही वाटले नव्हते.

पण भारतीय संघाने दुसरा कसोटी सामना जिंकला. तिसरा सामना ड्रॉ करत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर आणलं. ब्रिस्बेनच्या गाबाच्या मैदानात 31 वर्षे अपराजित असण्याचा ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड टीम इंडियाने धुळीस मिळवला होता. गाबा टेस्ट वेळी ड्रेसिंग रुमचा माहोल एखाद्या हॉस्पिटल सारखा होता. पहिल्या कसोटी सामन्यापासूनच टीम इंडियाच्या ताफ्यात दुखापतीचा सिलसिला सुरु झाला आधी मोहम्मद शमी, मग उमेश यादव, अश्विन, जाडेजा आणि बुमराह यांना दुखापत झाली. या परिस्थितीत अने नव्या खेळाडूंना संघात स्थान मिळाले. त्यांना संधीच सोन करुन दाखवत टीम इंडियाच्या ऐतिहासिक मालिका विजयात मोलाचा वाटा उचलला.

ब्रिस्बेनच्या गाबा मैदानात झालेल्या सामन्यात दोन खेळाडूंनी कसोटी पदार्पण केले. नेट बॉलर म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सामील झालेल्या टी. नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदरने या सामन्यातून पदार्पण केले होते. मोहम्मद सिराज भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज होता. त्याच्याकडे अवघ्या दोन ते तीन मॅचचा अनुभव होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT