Gautam Gambhir Ravi Shastri  esakal
क्रीडा

Gautam Gambhir : फालतू चर्चा आहे हे फार महत्त्वाचं नाही... रवी शास्त्रींच्या संकल्पनेवर गंभीर जाम भडकला

अनिरुद्ध संकपाळ

Gautam Gambhir Ravi Shastri : भारताने मायदेशात होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये कोणत्या कॉम्बिनेशनचा संघ निवडावा यावर गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा सुरू झाली आहे. भारतीय संघात डावखुरे फलंदाज असावेत अशी अनेक तज्ज्ञांची मते आहेत. मात्र संघात किती डावखुरे फलंदाज असावेत याबाबत मतमतांतर आहेत.

याबाबत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपले मत व्यक्त केले होते. त्यांनी प्लेईंग 11 मध्ये 3 डावखुरे फलंदाज असावेत असे वक्तव्य केले. मात्र गौतम गंभीरने ही संकल्पना नाकारली. त्याने एक वेगळाच विचार समोर मांडला.

गौतम गंभीर 3 डावखुऱ्या फलंदाज संकल्पनेवर भडकला

गौतम गंभीर स्टार स्पोट्सशी बोलताना म्हणाला की, फलंदाज डावखुरा आहे की उजव्या हाताचा हे महत्वांच नाही. खेळाडूची निवड ही फक्त त्याच्या फॉर्मनुसार झाली पाहिजे.

गंभीर पुढे म्हणला की, 'यावर खूप चर्चा सुरू असल्याचं मी पाहतोय. मात्र माझ्या मते ही खूप फालतू चर्चा आहे. तुम्ही खेळाडूचा दर्जा पाहता, तो कोणत्या हाताने फलंदाजी करता हे पाहत नाही. जर तुम्हाला माहिती आहे की केएल राहुल आणि श्रेयस अय्यर धावा करत आहेत तर डावखुरा फलंदाज निवडण्याची गरज नाही.'

गंभीरच्या मते डावखुरा फलंदाज इतका प्रभावशाली ठरेल असे वाटत नाही. जर तुमचे डावखुरा फलंदाज यशस्वी जैयस्वाल दर्जेदार खेळाडू असून तो फॉर्ममध्ये देखील आहे. तिलक वर्मा जर चांगला खेळत असेल तर त्याला संघात ठेवलं पाहिजे. जर अय्यर - राहुल चांगले खेळत असले तर त्यांनाही संघात निवडलं गेलं पाहिजे.

रवी शास्त्री काय म्हणाले होते?

रवी शास्त्री यांनी नुकतेच वर्ल्डकपसाठी भारतीय संघात तीन डावखुरे फलंदाज असायला हवेत असे वक्तव्य केलं होतं. रवी शास्त्री यांनी ही गोष्ट पहिल्यांदाच सांगितली नाही तर यापूर्वीही त्यांनी भारतीय संघात डावखुऱ्या फलंदाजीचा कमतरता असल्याचे सांगितले होते. ही पोकळी लवकर भरण्याची गरज असल्याचेही तो म्हणाला होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT