Gautam Gambhir on Virat Kohli sakal
क्रीडा

T20 World Cup : Virat Kohli ने ओपनिंग करावी का? गंभीर म्हणाला हा मूर्खपणा...

कोहलीने ओपनिंग करावी का? या चर्चेत गंभीरने पाच शब्दात स्पष्टीकरण देत म्हणाला की....

Kiran Mahanavar

Gautam Gambhir on Virat Kohli : आशिया चषक 2022 मध्ये विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध ओपनिंग करत शतक केले. तेव्हापासून टी-20 विश्वचषकमध्ये विराट कोहलीने रोहित शर्मासोबत ओपनिंग करावी की नाही यावर सतत चर्चा होत आहे. काही माजी क्रिकेटपटूंनीही विराटला या भूमिकेसाठी परफेक्ट म्हटले आहे. मात्र गौतम गंभीर या संपूर्ण प्रकरणाला बकवास मानत आहे. कोहलीने ओपनिंग करावी का? या चर्चेत गंभीरने पाच शब्दात स्पष्टीकरण देत म्हणाला की, हा मूर्खपणा सुरू करू नका.

गौतम गंभीर स्टार स्पोर्ट्सच्या 'गेम प्लॅन' शोमध्ये म्हणाला की, विराटच्या फलंदाजीच्या सलामीबद्दल मूर्खपणा करू नका, जेव्हा तुमच्याकडे केएल राहुल आणि रोहित शर्मा संघात आहेत, तेव्हा विराट कोहलीला सलामी कशी करणार?. मी आधीही बोललो आहे की या मुद्द्यावर वाद घालू नका. तुम्ही नेहमी 3 क्रमांकावर लवचिक असले पाहिजे. कारण जर तुमचा सलामीवीर 10 षटके फलंदाजी करत असेल तर सूर्यकुमार यादवला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले पाहिजे जेणेकरून धावांचा वेग वाढवता येईल. जर विकेट लवकर पडली तर विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर यायला हवे.

भारताचा टी-20 वर्ल्डकपसाठीचा संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मुंबईत ऐन दिवाळीत दुर्घटना, चाळीत आग लागून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघे जखमी

Nagpur Fraud: नागपूर शहरात घट्ट होतोय ‘डिजिटल अरेस्ट’चा विळखा; सेवानिवृत्त अधिकारी टार्गेट; ७५ लाखांपेक्षा अधिकची फसवणूक

Latest Marathi News Live Update : मधुराईत कागद आणि भंगार धातू साठवणाऱ्या गोदामाला आग, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव

उपोषणस्थळी भेटायला वेळ नाही, उपोषणकर्त्याला घरी बोलावून पाजला ज्यूस, शिंदेंच्या मंत्र्यांची असंवेदनशीलता

शाहिद आफ्रिदीने 'लायकी' दाखवली! अफगाणिस्तानला उपकाराची आठवण करून दिली ; म्हणतो, आम्ही तुम्हाला पोसतोय...

SCROLL FOR NEXT